शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अरसोडा जंगलात अवैध वृक्षतोड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:24 IST

आरमोरी बिटअंतर्गत येत असलेल्या अरसोडा जंगलातील कक्ष क्र. ६७ मध्ये मागील एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे.

ठळक मुद्देजंगलाच्या सभोवताल ओल्या सरपणाचे ढीग : लहान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल

आॅनलाईन लोकमतजोगीसाखरा : आरमोरी बिटअंतर्गत येत असलेल्या अरसोडा जंगलातील कक्ष क्र. ६७ मध्ये मागील एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. जंगलाला लागून असलेल्या शेतांमध्ये ओल्या सरपणाचे मोठमोठे ढीग दिसून येत आहेत.ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक अजूनही चुलीवरच सरपणाच्या मदतीने स्वयंपाक करतात. शेतीची कामे संपली असल्याने ग्रामीण भागातील नागरिक आता वर्षभर पुरेल एवढे सरपण गोळा करीत आहेत. जंगलात जाऊन जीवंत झाडे तोडली जात आहेत. सदर झाडे तोडून जंगलाशेजार असलेल्या शेतांमध्ये ठेवली जात आहे. रात्रीच्या सुमारास बैलबंडीच्या सहाय्याने सदर सरपण रात्री आणले जात आहे. यामध्ये हजारो वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. मात्र शहरात राहून वेतन उचलणाºया वनरक्षक व वनपालाला ही बाब माहित नसावी. जंगलाच्या संरक्षणासाठी वनरक्षक येत नाही. ही बाब गावातील नागरिकांना पक्की माहित असल्याने नागरिक खुलेआम वृक्षांची तोड करीत आहेत. यामुळे कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होत चालली आहे. एक रोपटे जगविण्यासाठी शासनाला हजार ते दोन हजार रूपये खर्च करावे लागतात. अरसोडा जंगलातील कक्ष क्र. ६७ मध्ये अनेक लहान वृक्ष आहेत. सदर वृक्षांची लहान असतानाच तोड केली जात असल्याने संपूर्ण जंगल नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालून सदर वनरक्षकास जंगल संरक्षणाचे काम करण्याचे सक्त निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.जंगलाच्या जवळपास सरपन जमा करून ठेवलेल्या एका नागरिकाला लोकमत प्रतिनिधीने विचारले असता अरसोडा येथे अजूनपर्यंत गॅसचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना सरपणाच्या मदतीने स्वयंपाक करावा लागत असल्याने झाडांची तोड केल्याशिवाय पर्याय नाही. मागेल त्याला गॅस देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. वन विभाग सुद्धा गॅसचे वितरण करून तीन वर्ष मोफत गॅस भरून देते. तरीही या गावातील नागरिकांना गॅस कशी काय मिळाली नाही, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.