शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील वणव्याकडे दुर्लक्ष

By admin | Updated: March 13, 2016 01:28 IST

एफडीसीएम मार्र्कं डा (कं.) क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कम्पार्टमेंट क्र. २२९, २३० मधील एक किमी अंतरावरील जंगल जळून खाक होत आहे.

वन कर्मचारी सुस्त : आठवड्यातील दुसरी घटना; मार्कंडा (कं.) येथे उपाययोजनांचा अभावआष्टी : एफडीसीएम मार्र्कं डा (कं.) क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कम्पार्टमेंट क्र. २२९, २३० मधील एक किमी अंतरावरील जंगल जळून खाक होत आहे. मात्र या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आठवड्यात दुसऱ्यांदा जंगलाला मोठ्या प्रमाणावर वणवा लागलेला आहे. मार्र्कंडा (कं.) क्षेत्रातील कम्पार्टमेंटमध्ये जंगलाला शनिवारी आग लागली. या कक्षाचे वनरक्षक संकल्प उमरे यांच्याशी काही नागरिकांनी संपर्क साधला. मात्र संपर्क झाला नाही. याबाबत वनपरिक्षेत्राधिकारी गुरनुले यांची नागरिकांनी विचारणा केली असता, वनकर्मचारी पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आग लागलेल्या स्थळी कोणताही वनकर्मचारी उपस्थित झाला नाही. अथवा आग विझविण्याचाही प्रयत्न करण्यात आला नाही. वनपरिक्षेत्रात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र वनसंरक्षणाकडे कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या आठवड्यात सलग ही दुसरी घटना असून कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, आपण आॅफिसमध्ये आहोत, असे उत्तर देण्यात आले. मात्र पत्रकारांनी कार्यालय गाठताच आॅफिस बंद होते. लिपीक व कर्मचाऱ्यांनी काही वेळाने आॅफिस उघडले. त्यांची नावे विचारली असता, नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. जंगलातील वणवे रोखण्यास वनकर्मचारी किती तत्पर असल्याचे या सर्व प्रकारावरून दिसूून येत आहे. सदर कम्पार्टमेंट श्वेता थोरात यांच्या अखत्यारित येत असल्याने वणवे लागण्यास कुणाला जबाबदार धरले जाईल, याकडे लक्ष लागले आहे.वणव्यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी गुरनुले यांची विचारणा केली असता, वनकर्मचारी लाकूड, फाटे, लठ्ठे आणण्याच्या कामात लागल्याने वनसंरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अशा प्रकारच्या वणव्यांना आळा घालण्यास व वणवे विझविण्यास अपयश येत आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)