शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मोफत तीन गॅस सिलिंडर हवे, ई-केवायसी केली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 14:55 IST

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : एजन्सीत करावी लागेल नोंदणी, लाभ घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने' अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत करून देण्यात येणार आहे. यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने संबंधित लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा; तसेच ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी गॅस डिस्ट्रिब्युटर शोरूममध्येही करता येईल. 

एच.पी. पे. अॅपवरून सेल्फ ई- केवायसी करता येते. ई-केवायसी ही एक साधी एक मिनिटाची प्रक्रिया आहे ज्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशिअल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे. ग्राहकांनी गॅससाठी ऑनलाइन बुकिंग करावे; तसेच तीन सिलिंडरची रक्कम लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सीमार्फत वसूल करण्यात येईल. त्याकरिता ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलिंडर खरेदी केल्यानंतर तीन सिलिंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाच्या रूपात जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. कुटुंबप्रमुख अर्थात पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन करावे लागणार आहे.

२३ गॅस परवानाधारक गडचिरोली जिल्ह्यात आहेत. यात भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) ६, इंडियन ऑइल (आय.ओ.सी.एल.) २, हिंदुस्थान पेट्रोलियम (एच.पी.सी.एल.) १५ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी कळविले आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली