शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

...तर वाचले असते काही पोलिसांचे प्राण, अधिकाऱ्यांचा आततायीपणा नडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:02 IST

कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

गडचिरोली  - कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस दलाकडे ३४ भूसुरूंग रोधक वाहने असताना ‘क्युआरटी’च्या (शिघ्र प्रतिसाद पथक) १५ जवानांसाठी त्यापैकी एकही वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. हे वाहन असते तर भूसुरूंग स्फोटाची झळ कमी जीवित हानी टाळणे शक्य झाले असते, असा कयास आहे.जिल्हा पोलीस दलाकडे नक्षलविरोधी अभियानासाठी २००७ मध्ये काही भूसुरूंग रोधक वाहने आली होती. त्यानंतर टप्प्या टप्प्यानेअशी एकूण ३४ वाहने गडचिरोली पोलिसांना मिळाली. जिल्ह्यात १० उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली १० क्युआरटी पथक आहेत. नक्षलविरोधी मोहिमेत तातडीने कुठेही जाण्यासाठी या पथकाला नेहमी सज्ज असावे लागते. त्यामुळे या पथकांसाठी १० भूसुरूंग रोधक वाहने असणे आवश्यक असताना त्या दिवशी कुरखेडा येथे हे वाहन नव्हते.परिणामी अधिकाºयांच्या आदेशानुसार या पथकाला तातडीने खासगी वाहनातून नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली त्या दादापूरकडे निघावे लागले. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी घात केला.नक्षलींच्या खबरीमुळे त्यांचा डाव यशस्वीदादापूरमध्ये रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराची वाहने जाळल्यानंतर पोलीस तिकडे जातील याचा अंदाज घेऊन जांभुळखेडा ते लेंढारीदरम्यानच्या छोट्या पुलाखाली नक्षलवाद्यांनी आधीच भूसुरूंग पेरून ठेवले होते. पण जानेवारीतच डांबरीकरणाने गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर भूसुरुंग पेरला असू शकतो याची पुसटशीही कल्पना पोलिसांना आली नाही. त्यामुळे कुरखेडाचे एसडीपीओ शैलेश काळे यांनी क्युआरटी पथकाला तिकडे बोलविताच हे १५ जवान निघाले. पोलीस पथक तिकडे निघाल्याचे कुरखेडा येथूनच खबरीकडून नक्षलवाद्यांना कळल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी