सुरेश भोयर यांचे आवाहन : देसाईगंज येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक देसाईगंज : काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, म्हणून पक्षाशी बंडखोरी करू नका, पक्षाशी निष्ठा कायम ठेवा, येथे निष्ठा ठेवणाऱ्यांचीच कदर केली जाते, असे प्रतिपादन काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा निरीक्षक सुरेश भोयर यांनी केले. देसाईगंज येथे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात बुधवारी घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आ. आनंदराव गेडाम, गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, जिल्हा निरीक्षक डॉ. भगत, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष हसनअली गिलानी, परशुराम टिकले, किशोर वनमाळी, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विलास ढोरे, पं. स. चे उपसभापती नितीन राऊत आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी भाजपने खोटा ढोल बदडून जनतेची दिशाभूल करून लोकसभेत सरकार आणले. मात्र या सरकारने जनतेला दिलेले आश्वासन पाळलेले नाहीत, अशी घणाघाती टिका या बैठकीत केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, महेश पापडकर, भाष्कर डांगे, आरिफ खानानी, राजू आकरे, नगरसेविका निलोफर शेख आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 02:12 IST