शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्हाही झाला असता सुजलाम् सुफलाम्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:04 IST

जिल्ह्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात बांधून पूर्ण केलेल्या ८० हजार कोटींच्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडिगड्डा) येत्या शुक्रवारी (दि.२१) उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देतेलंगणा सरकारची दूरदृष्टी : ८० हजार कोटींचा कालेश्वरम प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात बांधून पूर्ण केलेल्या ८० हजार कोटींच्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडिगड्डा) येत्या शुक्रवारी (दि.२१) उद्घाटन होणार आहे. तब्बल १८.२४ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणणाऱ्या या भल्यामोठ्या प्रकल्पाच्या उभारणीत जी दूरदृष्टी तेलंगणा सरकारने दाखविली तीच दूरदृष्टी महाराष्ट्र सरकारने दाखविली असती तर गडचिरोली जिल्हाही सुजलाम सुफलाम होऊन या जिल्ह्याचे मागासलेपण एका झटक्यात दूर होऊ शकले असते. परंतू तसे झाले नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या काठावर असूनही सिरोंचा तालुकावासियांचा घसा कोरडाच राहणार आहे.महाराष्ट्रातून वाहात गेलेल्या परंतू नांदेडनंतर तेलंगणात जाऊन पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाºया गोदावरीच्या पाण्यावर कालेश्वरम प्रकल्प उभारला जात आहे. याच ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातून वाहणारी प्राणहिता नदीही येऊन मिळते. परंतू या दोन्ही नद्यांचे पाणी उपलब्ध असताना महाराष्ट्र शासनाने कोणताही प्रकल्प उभारण्याची दूरदृष्टी दाखविली नाही. एवढेच नाही तर तेलंगणा सरकारला हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची परवानगी देताना महाराष्ट्र शासनाने त्या पाण्याचा काही वाटा दक्षिण गडचिरोली भागातील तीन-चार तालुक्यांना किंवा किमान सिरोंचा तालुक्याला देण्याची अट न ठेवता तेलंगणा सरकारपुढे नांगी टाकली. त्यामुळे सिंचन सुविधांच्या बाबतीत मागे असूनही गडचिरोली जिल्ह्याला या प्रकल्पातून कोणताही फायदा मिळवून देण्यात सरकारला यश आले नाही.विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पात गेली आहे. याशिवाय सरकारी जमीनही देण्यात आली आहे. तरीही या तालुक्यातील शेतकºयांना पाणी देण्यास तेलंगणा सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. असे असताना लोकप्रतिनिधींनी जनमानसाचा विचार न करता प्रकल्पाला विरोध केला नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.असा आहे कालेश्वरम प्रकल्प२०१६ मध्ये सुरू झालेल्या या ८० हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम अवघ्या तीन वर्षात पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील ५६ टीएमसी पाणी पिण्यासाठी तर १० टीएमसी पाणी उद्योगासाठी राखीव राहणार आहे. या प्रकल्पाच्या कालव्यांची लांबी १५३१ किलोमीटर एवढी आहे. विशेष म्हणजे २०३ बोगदे असून २० लिफ्ट राहणार आहेत. पाणी खेचण्यासाठी १९ पंप हाऊस उभारण्यात आले आहेत. भुयारी पंपिंग केंद्र आणि बोगद्यांमुळे कमीत कमी जागेचा वापर या प्रकल्पासाठी झाला आहे. जगातील सर्वात मोठे भूमिगत पंपिंग केंद्र असणारा हा प्रकल्प आहे.तरीही राज्यपाल, मुख्यमंत्री येणार?हा प्रकल्पाच्या उभारणीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी द्यावी यासाठी राज्यपाल सी.विद्यसागर राव यांनी विशेष स्वारस्य दाखविले होते. गृहराज्याचे पांग फेडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेताना पालकत्व स्वीकारलेल्या महाराष्ट्र राज्याचा तसुभरही विचार केला नाही. त्यामुळे दक्षिण गडचिरोली भागात या प्रकल्पाबद्दल प्रचंड नाराजी आहे. असे असताना या प्रकल्पाच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल येणार का? याबद्दल जिल्ह्याच्या दक्षिण भागात आश्चर्य आणि खेद व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प