शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

भाव नाही, तर तारण ठेवा ! धानासह विविध शेत मालासाठी शासनाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:02 IST

६ टक्के व्याजदर : बाजार समितींमध्ये गोदामाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतमालाचे दर बाजारात कमी असले किंवा भाव पडले असल्यास शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण ठेवून कर्ज प्राप्त करता येते. जेव्हा शेतमालाचे दर वधारतात, तेव्हा सदर माल शेतकऱ्यांना विक्री करता येतो. बाजार समितीद्वारा पणन विभागाच्या वतीने शेतमाल तारण योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो.

शेतमाल तारण योजनेत बाजारात शेतमालास भाव मिळत नसेल तेव्हा, शेतकऱ्यांना शेतमाल तारण ठेवता येतो व त्यांची निकड भागविता येते व बाजारात दरवाढ झाल्यानंतर शेतमाल विकता येतो व तारण कर्जाची परतफेड करता येते. या योजनेमध्ये पहिल्या सहा महिन्यांत ६ टक्के, नंतरच्या सहा महिन्यांत ८ टक्के व त्यानंतरच्या कालावधीसाठी १० टक्के व्याजाची आकारणी करण्यात येते. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये गोदामाची व्यवस्था असल्याने अनेक शेतकरी सदर योजनेचा लाभ घेत आहेत.

काय आहे शासनाची शेतमाल तारण योजना?

  • कृषी उत्पन्न बाजार १ समितीमध्ये राज्य शासनाच्या पणन महामंडळाच्या सहकार्याने ही योजना राबविते व याद्वारे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के प्रमाणात व अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यात येते.
  • याद्वारे शेतकऱ्याची निकड २ भागविली जाते व कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभघेतल्यास नुकसान होणार नाही

उपबाजार समित्यांमध्येही शेतमाल खरेदीची सोय आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे असल्याने अनेक शेतकरी धान मळणीनंतर शेतमालाची विक्री करतात. निवडक शेतकरी शेतमाल साठवून ठेवतात. ५ कृषी उत्पन्न बाजार समित्या जिल्ह्यात आहेत. सर्वच ठिकाणी शेतमाल तारण ठेवण्याची सोय आहे.

२४ तासांत कर्ज उपलब्ध केले जाते. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष लाभासाठी पणन महामंडळाच्या या योजनेत बाजार समितीचा सहभाग आहे. भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमाल विकता येतो. 

किती शेतकऱ्यांना लाभ?जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. मागील वर्षी गडचिरोली कृउबासमध्ये ११ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला. यंदा ३ शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे.

या शेतमालासाठी योजनाया योजनेत धान पिकासह मूग, उडीद, सोयाबीन, तूर व हरभरा या शेतमालांचा समावेश करण्यात आला आहे. शेतमाल ठेवल्यापासून विक्रीपर्यंत गोदाम भाडे व इतर खर्च समितीद्वारा करण्यात येतो.

"शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यात शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा आहे. गडचिरोली कृउबासमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे."- नरेंद्र राखडे, सचिव, कृउबास, गडचिरोली

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती