शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

आदर्श ग्रामसभेला मिळणार पुरस्कार

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

ग्रामसभांमध्ये नागरिकांची उपस्थिती वाढावी त्याचबरोबर ग्रामसभा कार्यक्षम पद्धतीने काम कराव्या यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रथमच आदर्श ग्रामसभा पुरस्कार देऊन

गडचिरोली : ग्रामसभांमध्ये नागरिकांची उपस्थिती वाढावी त्याचबरोबर ग्रामसभा कार्यक्षम पद्धतीने काम कराव्या यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रथमच आदर्श ग्रामसभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाचा निधी सरळ ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा होते. सदर पैशाचे नियोजन करण्याची व गावाचा विकास करण्याची फार मोठी जबाबदारी ग्रामसभेवर आहे. मात्र बहुतांश नागरिक ग्रामसभांना उपस्थित राहत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेतले जात नाही. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांचा ग्रामसभेतील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने यावर्षीपासून प्रथमच आदर्श ग्रामसभा स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची यासाठी निवड केली जाणार आहे. पुरस्कारासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती तालुक्यातील एका ग्रामसभेची निवड करून सदर प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करेल. जिल्हा स्तरीय समिती पाहणी करून जिल्ह्यातील तीन उत्कृष्ट ग्रामसभांचे प्रस्ताव आदर्श ग्रामसभा पुरस्कारासाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणार आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. आदर्श ग्रामसभेची निवड करताना ग्रामसभेची उपस्थिती, ग्रामसभेपूर्वी करण्यात येणारी प्रसिद्धी, ग्रामसभेपूर्वी वॉर्डाची सभा, महिला ग्रामसभा, ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. आदर्श ग्रामसभा म्हणून निवड झाल्यास सदर ग्रामपंचायतीला एक लाख रूपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आदर्श ग्रामसभा पुरस्कारामुळे नागरिकांची ग्रामसभेतील उपस्थिती वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)