शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गजराजांना वाचवण्यासाठी आता ‘आय सपोर्ट हत्ती कॅम्प’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 14:26 IST

कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणिसंग्रहालयात जाण्यापासून वाचविण्यासाठी आता ‘आय सपोर्ट हत्ती कॅम्प’ या नावाने समाजमाध्यमावर मोहीम उघडण्यात आली असून, त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

ठळक मुद्देअनेक पक्षांनी उठवला विरोधात आवाज

गडचिरोली : कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये गेल्या अर्धशतकापासून असलेल्या हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणिसंग्रहालयात जाण्यापासून वाचविण्यासाठी बहुतांश सर्वच पक्षांचे पदाधिकारी सरसावले आहेत.

‘लोकमत’ने सर्वप्रथम ही माहिती सर्वांसमोर आणल्यानंतर, हत्ती हलविण्यास विरोध सुरू झाला. आता ‘आय सपोर्ट हत्ती कॅम्प’ या नावाने समाजमाध्यमावर मोहीम उघडण्यात आली असून, त्याला सर्व स्तरातून पाठिंबाही मिळत आहे. त्यामुळे हत्तींना येथून हलविण्याचा निर्णय फिरवावा लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

आदिवासी जिल्ह्यावर डोळा ठेवू नका

या जिल्ह्यातील हत्ती ही राज्य सरकारची प्रॉपर्टी आहे. ती दुसऱ्या राज्यातील खासगी प्राणिसंग्रहालयात घेऊन जाऊ देणार नाही. मोदीसरकार महाराष्ट्रातील अनेक चांगल्या गोष्टी गुजरातकडे पळविण्याचा प्रयत्न करत आहे. आता आमच्या आदिवासी जिल्ह्यावर त्यांनी डोळा ठेवू नये. हत्ती कॅम्पमुळे लोकांना थोडाफार का असेना, रोजगार मिळून चार पैसे मिळतात. पुढे पर्यटक वाढतील तसा रोजगारही वाढेल. त्यामुळे हत्ती असे सहजपणे जाऊ देणार नाही.

- आ. धर्मरावबाबा आत्राम, अहेरी

पालकमंत्र्यांना निवेदन

या भागातील जनभावना लक्षात घेता हत्तींना गुजरातला नेण्याची परवानगी देऊ नये, या प्रकरणात वनमंत्री या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे. राज्यातील वनपर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र आहे. असे असताना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या प्राणिसंग्रहालयासाठी गजचिरोली जिल्ह्याचे हे वैभव तिकडे पाठविणे योग्य नाही.

- किरण पांडव, जिल्हा समन्वयक, शिवसेना

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हत्तींच्या स्थलांतराची कार्यवाही त्वरित रोखण्यात यावी, यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदनातून देण्यात आला. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. नितीन कोडवते, सोशल मीडिया प्रदेश महासचिव नंदू वाईलकर, तसेच शंकरराव सालोटकर, सतीश विधाते, सुनील चडगुलवार, रजनिकांत मोटघरे, हरबाजी मोरे, जितेंद्र मुनघाटे, संजय चन्ने, प्रतीक बारसिंगे, नदीम नाथानी, नरेश सोरते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पदाधिकारी सरसावले

याप्रकरणी शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार म्हणाले की, हा हत्ती कॅम्प वन विभागासाठी आणि जिल्हावासीयांसाठी भूषण आहे. या कॅम्पमुळे गडचिरोली जिल्ह्याची राज्यात चांगली ओळख आहे. हा निर्णय तमाम पर्यटकांसाठी दुर्दैव आहे. शिवसेना महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना मेल पाठवून हत्तींना रोखण्याची मागणी केली. माजी जिल्हा संघटिका छाया कुंभारे व इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

टॅग्स :environmentपर्यावरण