शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

आईपेठावरून माघारी परतले

By admin | Updated: April 7, 2016 01:12 IST

मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्याकरिता पोलीस बंदोबस्तात गेलेल्या चमूला आईपेठा गावातील शेतकरी, शेतमजूर ...

मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाचे सर्वेक्षण करणारे पोलीस बंदोबस्तातील पथक सिरोंचा : मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्याकरिता पोलीस बंदोबस्तात गेलेल्या चमूला आईपेठा गावातील शेतकरी, शेतमजूर व महिलांनी विरोध केल्यामुळे पथकाला माघारी परतावे लागले. या आंदोलनाचे नेतृत्व किसान आघाडीचे अध्यक्ष मधुसूदन आरवेली यांनी केले. बुधवारी सकाळी ११ वाजता सिरोंचाचे तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार यांच्यासह अधिकारी जी. रवींदर, नंदा हे सिरोंचाचे पोलीस अधिकारी दीपक लुकडे, पोलीस उपनिरिक्षक कदम, आसरअल्लीचे पोलीस अधिकारी यांच्या बंदोबस्तात सर्वेक्षण कामासाठी आईपेठा गावात पोहोचले. याबाबत गावकऱ्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या प्रकल्पाला पूर्वीपासूनच या परिसरातील लोकांचा विरोध लक्षात घेता अचानक पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षणासाठी आलेल्या या पथकाला शेतकरी, गावकरी, शेतमजूर, महिला यांनी प्रखर विरोध केला. किसान आघाडीचे अध्यक्ष मधुसूदन आरवेली यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन ग्रामस्थांनी बोलावून घेतले व यानंतर जमावाने तहसीलदारांचा निषेध करीत प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे तहसीलदारांनी सर्वेक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला व पथक माघारी फिरले. यावेळी वेमुला सत्यनारायण, किरण वेमुला, कोमेरे वेंकला, श्रीरंगी लक्ष्मण, ताटी राजू, सिरंगी राजबाबू, सरपंच मडे राजबाबू, ओद्दी राजबाबू, सिडाम लच्छीरेड्डी, सिरंगी नागेश, जी. डी. सत्यम, सिरंगी अविनाश, ताटी रमेश, ताटी क्रिष्टय्या, वेमुला प्रकाश आदींसह गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आईपेठा येथे सर्वेक्षणासाठी तेलंगणाचे दोन सिंचन अभियंतेही आले होते. त्यात जी. रविंदर व नंदा यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)