शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

पर्यावरणासाठी हायड्राेजन, इलेक्ट्रिक कार लय भारी, पण किमतीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

सध्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकीचा वापर वाढत आहे. गडचिराेली शहरातही अनेक इलेक्ट्रिक दुचाकी फिरताना दिसतात. मात्र शहरात इलेक्ट्रिकवर चालणारी एकही कार नाही. इलेक्ट्रिकवरील कार १६ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहे. एवढी किंमत मध्यमवर्गीय नागरिक खर्च करू शकत नाही. हायड्राेेजन कारची किंमत ५० लाखांच्या पुढे आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री हे चार दिवसांपूर्वी हायड्राेजनवर चालणाऱ्या कारमधून संसदेत पाेहाेचले. त्यामुळे हायड्राेजन व इलेक्ट्रवर चालणाऱ्या कारचा मुद्दा चर्चेत आला. या कार आपण खरेदी करू शकणार काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात हाेता. या कार पर्यावरणपूरक असल्या तरी त्यांच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येते. पेट्राेल व डिझेलच्या कारमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर हाेत चालली आहे. त्यामुळे या इंधनाला पर्याय म्हणून इतर इंधनांच्या वापराबाबतचे संशाेधन सुरू आहे. मात्र सामान्य नागरिकांना परवडेल, अशा कारची निर्मिती अजूनपर्यंत झाली नाही.

इलेक्ट्रिक कार १६ लाखांच्या पुढेसध्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकीचा वापर वाढत आहे. गडचिराेली शहरातही अनेक इलेक्ट्रिक दुचाकी फिरताना दिसतात. मात्र शहरात इलेक्ट्रिकवर चालणारी एकही कार नाही. इलेक्ट्रिकवरील कार १६ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहे. एवढी किंमत मध्यमवर्गीय नागरिक खर्च करू शकत नाही. 

हायड्राेजन कार ५० लाखांच्या पुढेहायड्राेजनवर चालणारी कार पर्यावरणासाठी अतिशय पूरक असल्याचा दावा केला जात असला तरी किमतीच्या बाबतीत ही कार परवडणारी नाही. हायड्राेेजन कारची किंमत ५० लाखांच्या पुढे आहे. 

सरकारने सबसीडी द्यावी-    पर्यावरणपूरक असलेल्या इलेक्ट्रिक, सीएनजी, हायड्राेजन कार व दुचाकींचा वापर वाढण्यासाठी या दुचाकींवर शासनाने सबसीडी देण्याची गरज आहे. सबसीडी मिळाल्यास वाहनांच्या किमती कमी हाेतील. मध्यवर्गीय नागरिक ही वाहने वापरू लागतील. 

सीएनजीची गरज

गडचिराेली शहरात सीएनजी पम्प सुरू केल्यास सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढू शकते. सीएनजीवर चालणारी वाहने पेट्राेल, डिझेलच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रदूषण तयार करतात. 

पेट्राेल व डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषण हाेते. ही बाब मान्य आहे. मात्र या दाेन इंधनाशिवाय इतर पर्याय नागरिकांसमाेर उपलब्ध नाही. त्यामुळे या दाेनच इंधनावर चालणारी वाहने खरेदी करतात. या दाेन इंधनाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापरायचे असेल तर ते स्वस्त हाेणे आवश्यक आहे.- आकाश बाेबाटे, तरुण

 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारcarकार