शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

शेकडो विद्यार्थ्यांनी केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2015 01:30 IST

येथील कॉम्प्लेक्स परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने अध्यासन करणे कठीण झाले आहे.

जिल्हा ग्रंथालयात गैरसोय : प्रशासनाविरोधात रोषगडचिरोली : येथील कॉम्प्लेक्स परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने अध्यासन करणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नगर पालिकेचे पाणीपुरवठा सभापती संजय मेश्राम यांच्या नेतृत्त्वात ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतून बाहेर पडून ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. शासनाने लाखो रूपये खर्च करून गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्लेक्स परिसरात प्रशस्त ग्रंथालयाची इमारत उभारली आहे. मात्र या ग्रंथालय कार्यालयात कर्मचाऱ्यांची वागणूक योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास होतो. वाढत्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत खुर्ची, टेबल व आसन व्यवस्था कमी पडत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण निर्माण होते. ग्रंथालयातील कर्मचारी दुपारी १२ वाजतानंतर ग्रंथविभागाला कुलूप लावून घरी जातात. त्यामुळे दुपारी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत नाहीत. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही विद्यार्थ्यांना न्याय देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शुक्रवारी ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीच्या जिल्हा ग्रंथालयाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. याप्रसंगी आकाश कंकलवार, सचिन रामटेके, स्वप्नील संगिडवार, अरविंद पाकमोडे, कुमोद निकोडे, योगीता कुमरे, अर्चना कुलसंगे, सोनाली झोडगे, अस्मिता दुधबळे, लोचन मेश्राम, रजनी शेंडे आदी उपस्थित होते. या संदर्भात जिल्हा ग्रंथालय अधिकारी वि. मू. डांगे यांची बाजू घेण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क केला. तर त्यांनी आपण नागपूर येथे बैठकीला आलो आहे. काय प्रकार झाला याबाबत आता काही सांगता येणार नाही. सोमवारी या संदर्भात सविस्तर माहिती देऊ, असे त्या म्हणाल्या. (स्थानिक प्रतिनिधी)निर्गम सहायकाचा अभावग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके देण्याकरिता निर्गम सहायक आवश्यक आहे. मात्र ग्रंथालयात सदर पद भरण्यात आले नाही. या ग्रंथालयात एकूण सहा पदे मंजूर आहेत. यापैकी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक व शिपाई आदी चार पदे भरण्यात आली असून ती कार्यरत आहेत. पुस्तक वितरणासाठी निर्गम सहायकाचे पद भरण्यात न आल्याने येथील कर्मचारी पुस्तक वितरणाचे काम एकमेकांवर ढकलत असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.