शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
4
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
5
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
6
इंडिगोची 'साडेसाती' संपता संपेना... आजच्या दिवशी तब्बल २०० विमान उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
7
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
8
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
9
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
10
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
11
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
12
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
13
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
14
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
15
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
16
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
17
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
18
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
19
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
20
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत मॅरेथॉनमध्ये धावले शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभापूर्वी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले. तिरंग्याची प्रतिकृती असलेले फुगे आकाशात सोडून तसेच शांतीचे प्रतीक असलेल्या कबत्तुरांना आकाशात सोडून आ.आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भगवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देशिवजयंतीचे औचित्य : आ.धर्मरावबाबा, सीआरपीएफ कमांडंट व पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी येथील मुख्य चौकात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थीनींसह विद्यार्थी धावले. या स्पर्धेचे उद्घाटन आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व कबुत्तरांना उडाण भरवून करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट रवींद्र भगत, श्रीराम मीना, अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, जि.प.चे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, पं.स.सदस्य हर्षवर्धनरावबाबा आत्राम, माजी प्राचार्य लुकमोद्दीन हकीम, यशवंत दोंतुलवार आदी उपस्थित होते.मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभापूर्वी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले. तिरंग्याची प्रतिकृती असलेले फुगे आकाशात सोडून तसेच शांतीचे प्रतीक असलेल्या कबत्तुरांना आकाशात सोडून आ.आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भगवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन पूर्वा दोंतुलवार यांनी केले तर आभार सुरेंद्र अलोणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी आदित्य जक्कोजवार, राजू पडालवार, नगर सेवक शैलेश पटवर्धन, अमोल मुक्कावार, नितीन दोंतुलवार, अप्सर पठाण, संदीप सुखदेवे, महेश येरावार, सत्यन्ना मिरगा, देवेंद्र खतवार, सूचित कोडेलवार, रक्षित नरहरशेट्टीवार, अनुराग पिपरे, राहुल ठाकरे आदींनी सहकार्य केले.या विजेत्या स्पर्धकांचा झाला गौरवमॅरेथॉन स्पर्धेत प्राथमिक गटातून क्रिश वड्डे प्रथम, अंकुश हेडो द्वितीय तर उमेश पुंगाटे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. माध्यमिक गटातून अनुक्रमे रुपेश नरोटी, विकास वाचामी, प्रकाश विडपी यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच खुले पुरुष गटातून प्रथम क्रमांक सुरेश चौधरी, द्वितीय संपतराव इष्टाम तर तृतीय क्रमांक राकेश लोहमडे यांनी मिळविला. महिला गटातून प्रथम क्रमांक पूजा फुलचे, द्वितीय सरिता नरोटी तर तृतीय क्रमांक शारदा तिम्मा यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना आ.धर्मरावबाबा आत्राम व अन्य मान्यवरांच्या हस्ते शिल्ड, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर मॅरेथॉन स्पर्धेत सीआरपीएफचे जवानही सहभागी झाले होते. यामध्ये बटालियन क्रमांक ३७ चे श्रीकांत पवार यांनी प्रथम, द्वितीय राहुल पटेल, तर तृतीय क्रमांक बटालियन क्रमांक ९ चे हवालदार दादाराव सोनटक्के यांनी पटकाविला. 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंती