शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:14 IST

संततधार पावसाने जुलै महिन्याची अखेर व आॅगस्ट महिन्याची सुरूवात झाली. याच संततधार पावसाने पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोर धरल्याने कोरडेठाक पडलेले नदी, नाले, तलाव, बोड्या जलमय होऊन ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गाढवी नदीची पाणीपातळी वाढली असल्याने नदी किनाऱ्यालगतचे शेकडो हेक्टरवरील धानपीक पाण्यात बुडाले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : धानपीक पाण्यात बुडाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : संततधार पावसाने जुलै महिन्याची अखेर व आॅगस्ट महिन्याची सुरूवात झाली. याच संततधार पावसाने पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोर धरल्याने कोरडेठाक पडलेले नदी, नाले, तलाव, बोड्या जलमय होऊन ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गाढवी नदीची पाणीपातळी वाढली असल्याने नदी किनाऱ्यालगतचे शेकडो हेक्टरवरील धानपीक पाण्यात बुडाले आहे.मागील १५ ते २० दिवसांत गाढवी नदी तीन ते चार वेळा फुगली. पाणीपातळी वाढल्याने परिसरातील धानपीक पाण्याखाली आले. याचा परिणाम धानपिकाच्या वाढीवर होत आहे. काही शेतकऱ्यांनी धानपिकाची नुकतीच रोवणी केली. मात्र ही रोवणीसुद्धा पाण्यात बुडाल्याने सडून जाण्याची तसेच पाण्यासोबतच्या वाळूमातीसह वाहून जाण्याची शक्यता आहे. काही सखल भागातील शेतातून पाण्याचा अनैसर्गिक प्रवाह तयार झाल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुरूवातीच्या टप्प्यात पाऊस पडत नसल्याने रोवणीयोग्य धानपºहे करपत असताना वरूणराजाने जबरदस्त हजेरी लावली. पावसामुळे रोवणी पूर्ण होण्यास मदत झाली. परंतु अतिपावसामुळे सखल भागातील शेतजमिनीतील रोवणीचे काम अद्यापही प्रलंबित आहे. गेल्या २० दिवसांपासून सर्वत्र पाणीचपाणी आहे. कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस होत असल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी रोवणी खोळंबली आहे.काही ठिकाणी धान रोवणीचे काम सुरू आहे. दुसरीकडे रोवणी झालेल्या शेतात पाणी साचल्यामुळे धानपिकाची वाढ होत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढवी नदी फुगली असून एकलपूर-विसोरा, शंकरपूर-चोप मार्गावरील नाले ओसंडून वाहत आहेत. विसोरा-शंकरपूर मार्गालालगतच्या शेकडो हेक्टर शेतजमिनीतील धानपीक पाण्यात बुडाले आहे. शंकरपूरवरून चोपला जाताना दोन्ही बाजूच्या बहुतांश शेतजमिनींना आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.जिकडेतिकडे पाणीचपाणी पसरले आहे. शंकरपूर-चोप मार्गावरील नाल्यावर पाणी सोडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर