शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

शौचालयांवर दीड कोटी खर्च

By admin | Updated: September 17, 2016 01:41 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार २०५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले.

९०७ शौचालये पूर्ण : गडचिरोली शहराची गोदरीमुक्तीकडे वाटचाल; पालिका प्रशासनाचा पुढाकारगडचिरोली : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार २०५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले. यापैकी पालिका प्रशासनाने ९०७ शौचालयाचे काम पूर्ण केले असून १ हजार ५८६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता व १ हजार ३७० लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान अदा केले आहे. शहरात शौचालय बांधकाम प्राधान्याने करण्यात येत असल्याने गडचिरोली शहराची गोदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात जुलै २०१५ पासून शौचालय निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्वच २३ वार्डात फिरून किती कुटुंबधारकांकडे शौचालये आहेत, किती कुटुंबाकडे शौचालय नाही, याबाबतचे सर्वेक्षण केले. त्यानंतर शौचालय नसणाऱ्या कुटुंबधारकांना नगर पालिकेत अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. आतापर्यंत पालिका प्रशासनाने शहरातून २ हजार ८७ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. यापैकी काही लाभार्थ्यांकडे त्रुट्या आढळून आल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. १ हजार ५८६ लाभार्थ्यांना शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी अग्रीम स्वरूपात पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. १ हजार ३७० लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष पाहणीत शहरातील ९०७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे काम पूर्ण केल्याचे आढळून आले. त्यांचे छायाचित्र प्राप्त झाल्यानंतर या लाभार्थ्यांना शेवटच्या तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम पालिका प्रशासनातर्फे अदा करण्यात आली.पालिकेला शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ कोटी २ लाख ७८ हजार, दुसऱ्या टप्प्यात २८ लाख ६८ हजार व तिसऱ्या टप्प्यात ६० लाख असे एकूण १ कोटी ९१ लाख ४६ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी पालिकेने आतापर्यंत वैयक्तिक शौचालयाच्या कामांवर १ कोटी ६७ लाख ४६ हजार रूपयांचा खर्च केला आहे. खर्चाअंती पालिका प्रशासनाकडे आता शौचालयाच्या योजनेचा २४ लाख रूपये निधी शिल्लक आहे. शौचालय बांधकामाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अर्ज करण्यास जानेवारीपर्यंत मुदतवाढ३१ मार्च २०१७ पर्यंत पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील ज्या कुटुंबधारकांकडे शौचालय नाहीत, त्या सर्व कुटुंबांना शौचालय योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शौचालय नसलेल्या अनेक कुटुंबांनी पालिकेकडे अर्ज केले नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने जानेवारी २०१६ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. शहरातील एकही कुटुंब शौचालयाविना राहू नये, या दृष्टीने पालिका प्रशासनाचे प्रयत्न असून प्रशासनाच्या वतीने शासनाकडे गरज पडल्यास आणखी निधीची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.