लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात सर्वत्र घरभाडे दर वाढले आहे. परिणामी गेल्या दोन वर्षात बहुतेक वॉर्डात घराचे भाडे १० टक्क्यांनी वाढले असल्याने भाडेकरू कुंटुबांनां आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष वाएत्या महागाईत सर्व साहित्यांची भाव वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत भूखंड, रेडीमेड घर तसेच किरायाचे दरही पुर्वीच्या तुलनेत आता प्रचंड वाढले आहे.
गडचिरोली शहराची लोकसंख्या ७० हजारांच्या वर असून घरांचीही संख्या बरीच वाढली आहे. नविन वस्तींचे प्रमाण वाढले आहे. जे कुटुंब नोकरी, व्यवसायासाठी येतो तसेच इतर कोणत्याही रोजगाराच्या शोधात येतो, असे लोक गडचिरोली जिल्हा मुख्यालयी आपले घर बांधण्याचा निर्णय घेतात. तसेच याच ठिकाणी भाडयाने राहतात. भाडेकरूंची संख्या अधिक वाढली असल्याने शहरात घर भाडे दर वाढले आहे. जितका विकसित व सोयीसुविधा एरिया असेल तेवढे घरभाडे दर अधिक असतात. कॅम्प एरिया, धानोरा मार्गावरील कार्मेल स्कूलच्या मागील परिसर, स्नेहनगर तसेच मुख्य मार्केटच्या परिसरात गेल्या दोन वर्षात घरभाड्यांमध्ये जवळपास १० टक्क्यांची वाढ झाली आहे. परवडत नसल्याच्या कारणावरून अनेक घरमालकांनी घरभाडे वाढविल्याचे दिसून येत आहे. मात्र याचा फटका भाडेकरूंना बसत आहे.
कन्नमवारनगरसह रामनगरात दर काय ?शहराच्या कन्नमवार व रामनगरातही गेल्या दोन वर्षांपासून भाड्याच्या घराचे दर वाढले आहेत. रामनगरात टूबीएचकेला ३५०० ते ४००० हजार रूपये इतके घरभाडे घेतले जात आहे.
कुठल्या भागांमध्ये जास्त वाढ ?गोकुलनगरातही घरभाडे वाढल्याचे दिसून येत आहे. एनबीएचकेच्या घराला ३५०० तर टूबीएचके घराला ४५०० हजार रूपये मोजावे लागत आहे.
कोणत्या भागात किती घरभाडे ?कॅम्प एरिया वनबीएचके ५५००कॅम्प एरिया टूबीएचके ७०००कार्मेल स्कूल वनबीएचके ४०००कार्मेल स्कूल टूबीएचके ५०००स्नेहनगर वनबीएचके ४०००
"जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली येथे वास्तव्यासाठी अनेक कुटुंबांची पसंती आहे. जागा कमी असल्याने जागेचे दर व घराचे भाडेदर वाढत आहे. महागाईनुसार दर घेतले जात आहेत."- योगेश भांडेकर, रिअल इस्टेट एजंट
"मागास असलेल्या गोकुलनगरातही आता स्वस्तःत भाड्याचे घर मिळत नाही. टूबीएचके घराला ३५०० ते ४००० हजार रूपये महिन्याला मोजावे लागत आहे. घरभाडे वाढल्याने इतर बाबींवरील खर्चाला कात्री लावली जात आहे. घरभाड्याच्या पैशासाठी बचत करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे."- शुभांगी धानोरकर, भाडेकरू, गोकुलनगर
"पूर्वीच्या तुलनेत आता बांधकाम साहित्याचे दर प्रचंड वाढले आहेत. शिवाय जाग्याचे दरही वाढले आहेत. १५ लाखांत बांधकाम होणाऱ्या घरासाठी आता २५ लाख रूपये लागत आहेत. त्यामुळे हा सर्व खर्च भरून काढण्यासाठी आणि नफ्यात राहण्यासाठी आम्हा घरमालकांना घरभाडे वाढविण्याशिवाय पर्याय नाही. धानोरा मार्गावरील लांझेडा परिसरातही भाडेकरूंची संख्या वाढल्याने घरभाडे वाढले आहे. या भागात वास्तव्य करण्यासाठी अनेकांचा कल आहे."- लोभिक नैताम, घरमालक, लांझेडा