शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

५८० अपात्र शिक्षकांमध्ये गडचिरोलीचे शिक्षक किती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:53 IST

Gadchiroli : अल्पसंख्याकच्या दर्जासाठी चढाओढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षण उपसंचालक नरड यांच्यासह पाच जणांना अटक झाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. ५८० अपात्र शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी बनविल्याचे समोर आल्यानंतर यात जिल्ह्यातील किती शिक्षकांचा समावेश आहे, याची चर्चा सुरू आहे.

बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात प्राथमिक वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे यांच्या निलंबनानंतर ११ एप्रिल रोजी रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली.

शिक्षक भरती बंद असल्याने शिक्षण संस्थाचालकांना पदे भरता येत नव्हती. त्यामुळे त्यांची अडचण झाली होती. अशातच मंत्रालयस्तरीय अधिकाऱ्याच्या बनावट पत्राचा आधार घेत काही शिक्षण संस्थांनी पदभरती केल्याची चर्चा आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचे धागेदोरे याच्याशी आहेत का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

अल्पसंख्याकच्या दर्जासाठी चढाओढमधल्या काळात शिक्षक भरती बंद होती. केवळ अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळांना पदभरती करण्यास सूट दिली होती. पदभरतीच्या आडून मलिदा लाटण्यासाठी जिल्ह्यातील काही संस्थांनी नियमांना बगल देत अल्पसंख्याक दर्जा मिळवला. अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी संस्थाचालकांत चढाओढ होती, यात मोठी उलाढाल झाल्याची चर्चा आहे. याची चौकशी होणार काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. 

दहा वर्षांपूर्वी होते शिक्षणाधिकारी

  • शिक्षण उपसंचालक उल्हास नरड हे मूळचे गडचिरोलीचे आहेत. त्यांनी दक्षिण गडचिरोलीत आदिवासी शाळेत शिक्षक म्हणून काम केले होते. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेद्वारे ते शिक्षणाधिकारी झाले.
  • दहा वर्षापूर्वी त्यांनी गडचिरोलीत शिक्षणाधिकारी म्हणून काम केले होते. अनेक संस्थाचालकांशी त्यांचे हितसंबंध असल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.. त्यांच्या अटकेनंतर भांडाफोड होण्याच्या भीतीमुळे संस्थाचालकांची झोप उडाली आहे.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली