शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तापाच्या साथीमुळे रूग्णालये फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:32 IST

जिल्हाभरात तापाची साथ पसरली असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बाल रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग व आंतररूग्ण विभागात रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. काही वार्डांमध्ये बेड अपुरे असल्याने फरशीवर गादी टाकून रूग्णांना उपचार घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देबाह्यरूग्ण विभागात रांगा : जागा कमी पडत असल्याने फरशीवर टाकाव्या लागल्या गाद्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरात तापाची साथ पसरली असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बाल रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग व आंतररूग्ण विभागात रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. काही वार्डांमध्ये बेड अपुरे असल्याने फरशीवर गादी टाकून रूग्णांना उपचार घ्यावा लागत आहे.सततचा पावसामुळे वातावरणात बदल होऊन मागील १५ दिवसांपासून जिल्हाभरात तापाची साथ पसरली आहे. नागरिकांना ताप, सर्दी, अंग दुखणे, खोकला आदींचा त्रास वाढला आहे. जिल्हा रूग्णालयातील प्रत्येक वार्डात क्षमतेपेक्षा अधिक रूग्ण भरती आहेत. जिल्हा रूग्णालयाची क्षमता २८६ बेडची आहे. मात्र प्रत्यक्षात ३०० पेक्षा अधिक रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच बाह्यरूग्ण विभागातही चिठ्ठी काढणे, औषधी वितरण विभागात रूग्णांची लांबच लांब रांग लागली असल्याचे दिसून येते. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली गर्दी दुपारी १ वाजेपर्यंत राहते. दुपारी ४ वाजता पुन्हा बाह्यरूग्ण विभाग उघडला जातो. त्यावेळी सुध्दा रूग्णांची गर्दी होत आहे. दरदिवशी ७०० ते १००० रूग्णांची नोंद होत आहे. रूग्ण व त्यांचे नातेवाईक यामुळे रूग्णालयाचा परिसर फुलून गेला आहे.कर्मचाऱ्यांवर वाढला कामाचा ताण१०० खाटांचे स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय बांधल्यापासून जिल्हा रूग्णालयावरील भार कमी झाला आहे. या रूग्णालयात सुध्दा बालकांची गर्दी दिसून येत आहे. १०० खाटांचे रूग्णालय असलेल्या या रूग्णालयात जवळपास दीडशे रूग्ण व गरोदर माता भरती आहेत. या रूग्णालयात तुलनेने मनुष्यबळ कमी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल