शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री महाराष्ट्राच्या शेवटच्या गावात, बॉर्डरवर संवाद; जवानांचं वाढवलं मनोबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 09:43 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले

मुंबई - महाराष्ट्र (Maharashtra) दिनाच्या पूर्वदिनी गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांना मोठं यश मिळालं. गडचिरोली येथे चकमकीत ३८ लाखांचे बक्षीस असलेले ३ नक्षलवादी (Naxali) ठार झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या C६० दलाने या नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर, दुसऱ्याचदिवशी म्हणजे महाराष्ट्र दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट छत्तीसगड महाराष्ट्राच्या बॉर्डवर पोहोचले. सैन्य दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईचं कौतुक करत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच आपण येथे आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. 

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही चकमक झाली होती. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी अहेरी तालुक्यातील दामरंचा गावात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. इतिहास घडला.. अतिसंवेदनशील भागात, अतिदूर्गम भागात नागरिकांमध्ये जाऊन संवाद साधला. त्यांच्या मनातले जाणून घ्यायचे प्रयत्न केले.. इथे सर्व बंधू भगिनींना, बालमित्रांना भेटून आनंद झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर म्हटले आहे.  तसेच, जिथे चकमक झाली, थेट छत्तीसगडच्या त्या सीमेवर देवेंद्र फडणवीस पोहोचले होते. दामरंचा हे महाराष्ट्राचे शेवटचे गाव आहे. इथे आपल्या पोलिसांनी माओवाद्यांवर फार चांगल्या प्रकारे जरब बसवली आहे. त्यांचे मनोबल वाढवणे माझे कर्तव्य आहे. इथे पोलीस, केवळ पोलिसांचेच काम नव्हे तर नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम पण करतात. त्यामुळे, या पोलिसांचा आम्हाला अभिमान असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. दामरंचा येथे महाराष्ट्राचं शेवटचं पोलीस स्टेशन आहे. त्यानंतर, छत्तीसगडमध्ये इथून ३६ किमी अंतरावरच पोलीस स्टेशन आहे. म्हणून, महाराष्ट्र पोलीसच तेथीलही सीमारेषेवर आपलं लक्ष केंद्रीत करतात, असे फडणवीस यांनी या भेटीदरम्यान सांगितले.    

दरम्यान, गडचिरोली भेटीदरम्यान, फडणवीसांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित लावली. यावेळी, पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलचे उद्घाटनही देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHome Ministryगृह मंत्रालयGadchiroliगडचिरोली