शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग रखडला, धूळ-गोंगाट वाढला! नागरिक त्रस्त, आरोग्यावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:31 IST

Gadchiroli : इको सेन्सेटिव्ह झोन'च्या नियमात महामार्ग कामाला 'लगाम'

हेमंत गेडाम लोकमत न्यूज नेटवर्कलगाम : गडचिरोली-आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ३५३ (सी) च्या बांधकामात विविध कारणांमुळे अडथळा येत आहे. सदर महामार्ग चामोर्शी-आष्टीच्या पुढे झाले असले तरी लगाम ते आलापल्लीदरम्यानचे काम पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सेटिव्ह झोन) मुळे रखडले आहे. या मार्गाच्या निर्मितीत आणखी किती अडथळे आहेत? असा सवाल नागरिकांचा आहे. 

गडचिरोली-आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या उन्नतीकरणाचे काम सुरू आहे; परंतु लगाम ते आलापल्ली या १७ किमी परिसरात चपराळा अभयारण्य येते. हा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ईएसझेड) व इस्टर्न विदर्भ लैंडस्कॅप (ईव्हीएल) म्हणजेच वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचा संचार असलेला आहे. यामुळे सदर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी वनविभागाची अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही.

धुळीमुळे श्वसनाचे विकारराष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे सतत धूळ उडते. हीच धूळ श्वसनमार्गात जाते. यामुळे विविध विकार बळावत आहेत. याशिवाय दिवसरात्र वाहनांच्या वर्दळीमुळे गोंगाट असतो. गोंगाटामुळे नागरिकांची झोपमोड होते.

'ईएसझेड' प्रभावित मार्ग, मंजुरी मिळेनालगाम- आलापल्लीपर्यत १७किमीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी एकूण ५४.२७४ हेक्टर जंगल क्षेत्राचे वळण (डायव्हर्जन) प्रस्तावित करण्यात आले होते. या अंतर्गत पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने स्टेज-१ ला २१ नोव्हेंबर २०२३ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर कार्य परवानगी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मिळाली; परंतु ही परवानगी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि वन्यप्राणी संचार मार्ग वगळून दिली होती.

"अवजड वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असल्याने लगाम परिसरातील नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात ही स्थिती आणखी बिकट होऊ शकते."- दीपक मडावी, सरपंच, लगाम

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीroad safetyरस्ते सुरक्षा