चामोर्शी शहरात रस्ता खोदकाम व नालीचे बांधकाम सुरू आहे, तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने ये-जा करीत असतात. काम सुरू असलेल्या ठिकाणी टँकरने पाणी टाकले जात नाही. हायवेचे काम संचारबंदीमुळे बंद आहे. आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा आहे. धुळीच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी हायवेच्या कंत्राटदाराने दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी टाकण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. चामोर्शी शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळ कोरोना महामारीत कोणतीही व्यक्ती अतिआवश्यक कामाशिवाय बाहेर फिरू नये यासाठी वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलीस चौकी लावण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र सेवा द्यावी लागते. त्यांनासुद्धा या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
===Photopath===
020521\02gad_6_02052021_30.jpg
===Caption===
ट्रकच्या मागे असा धूळ उडताे.