शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित गुरूदेवला उपचारासाठी गरीबी ठरतेय शाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:05 IST

कुकडी येथील गुरूदेव उमाजी टिकले या युवकाच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत.

ठळक मुद्देदोन्ही किडण्या निकामी : प्रत्यारोपणासाठी साडेतीन लाखांचा खर्च

आॅनलाईन लोकमतविसोरा/तुळशी : कुकडी येथील गुरूदेव उमाजी टिकले या युवकाच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत. त्याला डायलिसीससाठी महिन्याचा ३० हजार रूपये खर्च येत असून गरीबीमुळे हा खर्च करणे त्याला अशक्य होत असल्याने समाजाकडून मिळणाºया मदतीकडे त्याची आस लागली आहे.गुरूदेवचे पितृछत्र कुमारवयातच हरविल्याने उच्च शिक्षण घेण्याबरोबरच कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचा त्याचा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबासाठी गुरू व देव झाला. जिद्दी व आशावादी असलेल्या गुरूदेवने स्वत:च्या मेहनतीने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलली. मात्र बीएच्या अंतिम वर्षाला असताना त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्याने त्याचा जीवनासोबतचा संघर्ष आणखी वाढला. त्याला महिन्यातून जवळपास आठवेळा डायलिसीस करावे लागते. यासाठी प्रत्येक महिन्याला जवळपास ३० हजार रूपये खर्च येतो. उपचारासाठी यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयांची मदत मिळाली. देसाईगंज येथील मायक्रोटेक कॉम्प्युटरचे संचालक यांनीही बरीच मदत केली. मात्र उपचारादरम्यान सर्व निधी संपल्याने आता पुढे काय करावे, असा प्रश्न गुरूदेव समोर उभा ठाकला आहे. आई मोलमजुरी करते. गुरूदेवसोबतच दोन भाऊ व आजीचाही सांभाळ गुरूदेवच्या आईला करावा लागतो. किडणीचे प्रत्यारोपण केल्यास डायलिसीसचा खर्च येणार नाही. मात्र किडणी प्रत्यारोपणाचा खर्च साडेतीन लाख रूपये एवढा पैसा गुरूदेवजवळ नसल्याने समाजाकडून आर्थिक मदतीची आस गुरूदेव बाळगूण आहे. गुरूदेवचा स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा देसाईगंज येथील बँक खाता क्रमांक ३१५१५४६३३८५ हा असल्याचे कुटुंबांनी कळविले आहे.