शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना उच्चदाबाचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:10 IST

महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) गडचिरोली मंडळातील ८९९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरात काम सुरू : महावितरणची उच्चदाब वितरण प्रणाली योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) गडचिरोली मंडळातील ८९९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.या योजनेंतर्गत एका वितरण रोहीत्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततचा विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची आता कायमची सुटका होणार आहे. या योजअंतर्गत ३१ मार्च २०१७ सोबतच ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एचव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे.या आधुनिक तंत्राचा (एचव्हीडीएस) वापर करून अधिक व्होल्टेज असलेल्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मयार्दीत ठेवत शेतकऱ्यांना पुरेशी वीज देता येणे शक्य आहे. त्यामुळे आकडा टाकून होणाऱ्या वीजचोरीसही आळा बसणार आहे. कृषी पंपांना शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.चंद्रपूर विभागातील घुग्गूस तालुक्यातील वेंडली गावातील संजय नागापूरे , बल्लारषा विभागातील पोंभूर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी गावातील जनार्धन खोब्रागडे , गडचिरोली मंडलातील पारडी गावातील भास्कर सितकुरा गंडाटे, चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई हरीदास देवतेळे यांच्याकडे वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई हरीदास देवतेळे यांनी महावितरणच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. उच्च वीजदाबामुळे कापसाचे पीक घेण्यास मदत झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.गडचिरोली तालुक्यातील पारडी गावातील भास्कर सितकुरा गंडाटे यांच्या सव्वादोन एकर शेतात आता पाण्याची सोय झाल्याने धानाचे पीक चांगल्याप्रकारे घेता आले आहे. रबीतही उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे.

टॅग्स :electricityवीज