शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज न.प.च्या मनसुब्यांवर उच्च न्यायालयाने सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:42 IST

देसाईगंज नगर परिषदेने न्यायालयाच्या ताब्यात असलेल्या न.प.च्या जागेवरील आपला हक्क गृहित धरून काढलेली निविदा वादग्रस्त ठरली आहे.

ठळक मुद्देइमारत बांधकाम प्रकरण : जागा देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज नगर परिषदेने न्यायालयाच्या ताब्यात असलेल्या न.प.च्या जागेवरील आपला हक्क गृहित धरून काढलेली निविदा वादग्रस्त ठरली आहे. ही जागा न्यायालयाकडून परत घेण्यासाठी त्या जागेची आवश्यकता नसल्याचे प्रमाणपत्र देण्याची न.प.ची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे त्या जागेवर आपली प्रशासकीय इमारत उभी करण्याच्या मनसुब्यांवर देसाईगंज नगर परिषदेला पाणी सोडावे लागणार आहे.या प्रकरणी देसाईगंज बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.गुरू यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली. त्यात सदर प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली यांनी उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण सादर केले होते. मात्र उच्च न्यायालयाने नगर परिषदेची मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ३६ अंतर्गत ०.६२ हे.आर. या जागेची न्यायालयाला आवश्यकता नसल्याचे प्रमाणपत्र देण्याची मागणी अमान्य केली असल्याचे जिल्हा न्यायालयाने ८ सप्टेंबर २०१७ रोजी नगर परिषदेला कळविले आहे. नगर परिषद ती निविदा रद्द करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ३ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देसाईगंज नगर परिषदेच्या नवीन प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वर्षभरापूर्वी निविदा काढण्यात आली होती. मात्र ज्या जागेवर ही इमारत उभी करायची आहे ती जागाच न.प.च्या ताब्यात नसताना काढलेली निविदा अयोग्य असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्याच्या नगर विकास सचिवांनी दखल घेत या प्रक्रियेला स्थगित ठेवण्याचा आदेश या महिन्यात दिला होता.‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार देसाईगंजचे नगरसेवक हरिष देसामल मोटवानी यांनी या प्रकरणात प्रशासनाने हस्तक्षेप करून निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली. दरम्यान नगर विकास विभागाने या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत ही प्रक्रिया स्थगित ठेवण्यास सांगितले. नगर परिषदेच्या इमारतीचे आणि कंपाऊंड वॉलसाठी मिळून ३ कोटी ३३ लाख रुपयांच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया केली. परंतू ज्या जागेवर हे बांधकाम करायचे आहे ती जागा सध्या दिवानी न्यायालयाच्या ताब्यात आहे.