शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

हेल्पिंग हॅन्डस्च्या मदतीने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दुणावला

By admin | Updated: April 21, 2016 01:48 IST

अहेरी येथील हेल्पिंग हॅन्डस् या संस्थेने परिसरातून जमा केलेले सुस्थितीतील जुने शैक्षणिक साहित्य फासेपारध्यांची मुले शिकत असलेल्या ....

अहेरीकरांचे दातृत्व : मंगरूळ चवाळाच्या शाळेत रंगला दान महोत्सवअहेरी : अहेरी येथील हेल्पिंग हॅन्डस् या संस्थेने परिसरातून जमा केलेले सुस्थितीतील जुने शैक्षणिक साहित्य फासेपारध्यांची मुले शिकत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या मंगरूळ चवाळा गावातील आश्रमशाळेत नेऊन वितरित केले. हेल्पिंग हॅन्डस्च्या या साहित्यामुळे शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दुणावला. अहेरीकरांच्या या दान महोत्सवाचा सोहळा परवा मंगरूळ चवाळाच्या शाळेत रंगला. विदर्भासह मराठवाडाच्या अनेक भागात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. अशा स्थितीत गरजूंना मदतीचा हात द्यावा, या हेतुने हेल्पिंग हॅन्डस् या अहेरीच्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. अहेरीसह गडचिरोली जिल्ह्याच्या परिसरातून त्यांनी जुने व सुस्थितीत असलेले कपडे, शैक्षणिक साहित्य जमा केले. हे साहित्य गरजूपर्यंत पोहोचविण्याचा विडा हेल्पिंग हॅन्डस् संस्थेचे अध्यक्ष प्रतीक मुधोळकर यांनी उचलला. प्रतीक मुधोळकर यांच्या नेतृत्वात हेल्पिंग हॅन्डस्चे हजारो हात हे साहित्य संकलित करण्यासाठी भिडले होते. दहा दिवस हा उपक्रम राबविल्यानंतर जमलेले साहित्य श्रमसाफल्य बहुउद्देशीय संस्था घाटंजी, आधार फाऊंडेशन यवतमाळ, अस्तित्व फाऊंडेशन यवतमाळ यांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मंगरूळ चवाळा येथील आदिवासी आश्रमशाळेत फासेपारधी या आदिवासी जमातीतील मुले शिक्षण घेतात, अशी माहिती त्यांना मिळाली. या शाळेत शिकणाऱ्या अनेक मुलांचे कुटुंब प्रमुख वेगवेगळ्या गुन्ह्याच्या कारणांमुळे कुटुंब एकट्यावर सोडून गेले आहेत. अठराविश्व दारिद्र्यामुळे मुलांची आबाळ होत आहे.शिक्षणाचा अभाव यामुळे निर्माण होतो, ही बाब जि.प. शाळेत शिक्षक असलेले मतीन भोसले यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पुढाकार घेतला. शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी याच गावात अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केली. ४९० विद्यार्थी तेथे शिकत आहेत. त्यातील १८० विद्यार्थी अनाथ आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी नुकतीच या शाळेला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली होती. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले होते. त्यानंतर हेल्पिंग हॅन्डस्चे सर्व साहित्य या शाळेला पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हेल्पिंग हॅन्डस्सह इतर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मंगरूळ चवाळा गावात दाखल झाले. शाळेच्या प्रांगणातच शेकडो बालकांच्या उपस्थितीत साहित्य वितरणाचा दान महोत्सव येथे साजरा झाला. विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी हेल्पिंग हॅन्डस्चे प्रतीक मुधोळकर, पूर्वा दोंतुलवार, ममता पटवर्धन, किरण भांदककर, आधार फाऊंडेशन यवतमाळचे राजीव पडगीलवार, श्रमसाफल्य संस्थेचे अमित पडलवार, अस्तित्व फाऊंडेशनच्या मनिषा भोसले (काटे) आदी उपस्थित होते. या सर्वांचे मतीन भोसले यांनी स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उराशी घेऊन हे सारे मान्यवर तेथून परतले. (तालुका प्रतिनिधी)