ऑनलाईन लोकमतआलापल्ली: तालुक्यातील शंकरपूर (वेलगूर, किष्टापूर) येथील शेतकरी मुकूंदा वसाके यांच्या तणसाच्या ढिगाला आग लागल्याने आॅईल इंजिनसह पाईप जळून खाक झाले. यामुळे वसाके यांचे १० ते १२ हजार रूपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नुकसानीची पाहणी करून संबंधित शेतकºयास आर्थिक मदत दिली.तणसाच्या ढिगाला लागलेल्या आगीत आॅईल इंजिनसह पाईप जळून खाक झाल्याने शेतकरी वसाके यांच्यासमोर जनावराच्या वैरणाचा व शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी त्यांना मदतीचा हात दिला. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन कंकडालवार यांनी त्यांना दिले.यावेळी पं.स. सदस्य गीता चालुरकर, माजी सरपंच लालू करपेत, पिंटू मोहुर्ले, जुलेखभाई शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कंकडालवार यांनी वसाके यांच्याशी चर्चा केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:17 IST
ऑनलाईन लोकमतआलापल्ली: तालुक्यातील शंकरपूर (वेलगूर, किष्टापूर) येथील शेतकरी मुकूंदा वसाके यांच्या तणसाच्या ढिगाला आग लागल्याने आॅईल इंजिनसह पाईप जळून खाक झाले. यामुळे वसाके यांचे १० ते १२ हजार रूपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नुकसानीची पाहणी करून संबंधित शेतकºयास आर्थिक मदत दिली.तणसाच्या ढिगाला लागलेल्या ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत
ठळक मुद्देतणसाच्या ढिगाला आग : जि.प. उपाध्यक्षांनी केली पाहणी