गडचिरोली : तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव अतिवृष्टीने झाला असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई आर्थिक मदत तसेच पीक विम्याची मदत तत्काळ देण्यात यावी, अशा मागणीचे साकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दल तालुका गडचिरोलीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घालण्यात आले आहे. राकाँ सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सचिन चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात धानपिकावर करपा, तुडतुडा, कडाकरपा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी धान पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश कृषी विभागातील अधिकाऱ्यांना द्यावे, अशी मागणी सचिन चौधरी यांनी केली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By admin | Updated: October 27, 2016 01:42 IST