शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

अंकिसा परिसरात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. याशिवाय या भागातील शेतकरी मिरची, कापूस पिकाचीही लागवड करतात. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन या भागात घेतले जाते. हलके, मध्यम व जडप्रतीच्या धानाची लागवड केली जाते. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी हलके व मध्यम प्रतीच्या कमी मुदतीच्या धानपिकाची शेतात लागवड केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान : अंकिसा परिसरातील शेकडाे एकरवरील धानपीक पडले आडवे

लाेकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिराेंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरात मंगळवारी रात्रभर वादळी पाऊस बरसला. या वादळी पावसाचा धान, मिरची, कापूस पिकांना माेठा फटका बसला. या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अंकिसा परिसरात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. याशिवाय या भागातील शेतकरी मिरची, कापूस पिकाचीही लागवड करतात. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन या भागात घेतले जाते. हलके, मध्यम व जडप्रतीच्या धानाची लागवड केली जाते. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी हलके व मध्यम प्रतीच्या कमी मुदतीच्या धानपिकाची शेतात लागवड केली. तुडतुडा, मावा व इतर राेगाचे व्यवस्थापन करून व कीटकनाशक फवारणीवर हजाराे रुपयांचा खर्च केल्यानंतर शेतकऱ्यांचे धानपीक वाचले. हलके धानपीक पूर्णत: निसवल्याने येत्या काही दिवसात या धानाची कापणी करण्यात येणार हाेती. हातात भरघाेस उत्पादन हाेईल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना हाेती. दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास बराचवेळ वादळी पाऊस बरसला. पावसापेक्षा वादळाचा वेग अधिक हाेता. परतीच्या वादळी पावसामुळे परिसराच्या बालमृत्यमपल्ली येथे धानपिकाचे माेठे नुकसान झाले. कापणीयाेग्य झालेला शेतातील उभे धानपीक आडवे पडले. कापूस व मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे.  शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी महसूल विभागाने बालमृत्यमपल्ली व अंकिसा परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस