शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या पाच तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:44 IST

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारच्या रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत दमदार पाऊस बरसला.

ठळक मुद्देजनजीवन प्रभावित नद्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात शनिवारच्या रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत दमदार पाऊस बरसला. पावसामुळे आलापल्ली-भामरागड व बामणी टेकडा ताला मार्ग बंद झाल्याने शेकडो गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ७७.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे.धानोरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या पाच तालक्यात अतिवृष्टी झाली. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागड शहरातील काही घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दमदार पाऊस बरसला.

पावसामुळे धान उत्पादकांना दिलासाचंद्रपूर- भंडारा जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून पावसाने हजेरी लावल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र धान रोवणीची रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी अद्यापही दमदार पावसाची प्रवासाची प्रतीक्षा आहे. मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धान रोवणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली होती. रोवणीनंतर पुरेसा पाऊसच न आल्याने जमिनीला भेगा पडल्या होत्या. दरम्यान, शनिवारपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे पुनरागमन झाल्याने धान उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी दिवसभर चंद्रपूर शहरासह सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. परिणामी खरीप हंगामातील खोळबंलेली शेतीची कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बोंड अळीचा प्रादुर्भावसुरूवातीला पावसाने साथ दिल्याने ही पिके जोमाने वाढत असल्याचे दिसून यत आहे. जिल्ह्यातील १० गावांमध्ये कपासीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे धान उत्पादक तालुक्यामध्ये रोवणीनंतर दमदार पाऊसच न आल्याने पीक करपण्याची स्थिती निर्माण झाली होती.

टॅग्स :Rainपाऊस