शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सहा गावांची जमीन मेडिगड्डात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:09 IST

महाराष्ट्रातून तेलंगणाच्या दिशेने जाणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमधील १८७.२२३ हेक्टर खासगी तर ६.१०६ हेक्टर शासकीय जमीन संपादित केली जात आहे.

ठळक मुद्दे६० टक्के जमीन मिळवली : गडचिरोली जिल्ह्याला पाणी मात्र मिळणार नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्रातून तेलंगणाच्या दिशेने जाणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील ६ गावांमधील १८७.२२३ हेक्टर खासगी तर ६.१०६ हेक्टर शासकीय जमीन संपादित केली जात आहे. त्यापैकी ६० टक्के जमीन प्रकल्पाने संपादितही केली आहे. परंतू या प्रकल्पातील एक थेंबही पाणी गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला येणार नसल्यामुळे प्रस्थापित शेतकऱ्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे.सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाºया गोदावरी नदीवरील तेलंगणा सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम गेल्या तीन वर्षांपासून झपाट्याने सुरू आहे. या प्रकल्पाचे पाणी चक्क हैदराबादपर्यंत वाहून नेले जाणार आहे. त्यासाठी मोठमोठ्या पाईपलाईन आणि कालव्यांचेही काम सुरू आहे.संपूर्ण तेलंगणा सुजलाम सुफलाम करण्याचा तेलंगणा सरकारचा मानस आहे. परंतू पाणी असूनही घशाला कोरड अशी स्थिती असणाºया गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांना सरकारच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे सिंचनाच्या अपुºया सुविधांचा सामना करावा लागत आहे.ज्या सहा गावांमधील जमीन या प्रकल्पासाठी घेतली जात आहे त्यात वडधम येथील २३.५६२ हेक्टर, आयपेठा येथील ७२.९५६ हेक्टर, पोचमपल्ली येथील ५२.०८५ हेक्टर जमीन आधीच संपादित करण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये तुमनूर माल येथील १३.०१० ेहेक्टर आणि पेंटीपाका येथील १३.८०० हेक्टर जागेची मागणी करण्यात आली.जानेवारी २०१९ मध्ये मुगापूरमधील ११.८१० हेक्टर जागेच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत त्यापैकी १२४.२०३ हेक्टर खासगी जागा प्रकल्पाच्या ताब्यात गेली आहे. अजून ६३.०२ हेक्टर जागा संपादित करणे बाकी आहे.विशेष म्हणजे ६.१०६ हेक्टर शासकीय आणि ३.३५ हेक्टर वनजमीनीची खरेदी अद्याप झालेली नाही. शेतकºयांकडून खासगी जमिनी खरेदी करताना थेट खरेदी करण्यात आल्यामुळे वाटाघाटी करणाºया बºयाच शेतकºयांना जमिनीचा चांगला मोबदला मिळाला आहे. परंतू त्यांना आपल्या सुपिक जमिनीपासून कायमचे मुकावे लागणार आहे. दुसºया ठिकाणी शेतजमीन घेऊन शेती करणे कितपत शक्य होईल यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.गडचिरोली जिल्ह्यावर अन्यायचमहाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारने केलेल्या करारानुसार या प्रकल्पाचा सर्व खर्च तेलंगणा सरकार करणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सर्व पाण्यावर त्यांनीच हक्क सांगितला आहे. वास्तविक या प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील ६ गावांमधील शेतकरी आपली जमीन देत असताना त्यांना थोडेतरी पाणी घेण्याचा आणि तशी तरतूद राज्य सरकारने करणे गरजेचे होते. परंतू त्याबाबत सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना त्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

टॅग्स :Damधरण