लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेतील ११ नगरसेवकांनी निवडणूक अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्र जोडले नाहीत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे याबाबतची याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती. ५ जून रोजी याबाबत सुनावणी ठेवली होती. याची पुढील सुनावणी १९ जून रोजी घेतली जाणार आहे.नगरसेवकांच्या वकिलांनी नगरसेवकांची बाजू मांडताना नगरसेवकांना केवळ सुनावणीची नोटीस पाठविले आहे. मात्र नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी कोणते पुरावे याचिकाकर्त्याने दाखल केले आहेत, हे पुरावे जोडलेले नाहीत. हे पुरावे संबंधित नगरसेवकांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याचिकाकर्ते विनय बांबोळे यांनी नगरसेवकांना संबंधित पुरावे उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले. त्याचबरोबर या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जून रोजी घेतली जाईल, असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बांबोळे यांनी संबंधित नगरसेवकांना पुरावे उपलब्ध करून दिले आहेत.प्रत्येकी १० हजार रूपये जमा कराजिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी याचिकाकर्त्या दोघांपैकी एकाने प्रतीनगरसेवक १० हजार रूपयांची मागणी फोनवरून केल्याची व्हॉईसकॉल रेकॉर्डींग सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यात पैशाच्या बदल्यात हे प्रकरण शिथिल केले जाईल असे म्हटले आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या मुख्य उद्देशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘त्या’ नगरसेवकांची १९ ला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:30 IST
गडचिरोली नगर परिषदेतील ११ नगरसेवकांनी निवडणूक अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्र जोडले नाहीत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे याबाबतची याचिका जिल्हाधिकाºयांकडे दाखल करण्यात आली होती. ५ जून रोजी याबाबत सुनावणी ठेवली होती. याची पुढील सुनावणी १९ जून रोजी घेतली जाणार आहे.
‘त्या’ नगरसेवकांची १९ ला सुनावणी
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : याचिकाकर्त्याने नगरसेवकांना तक्रारीचे दस्तावेज दिले