शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:35 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर वेतन निकाली काढावे व अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी बुधवारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र : तीन महिन्यांचे वेतन रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर वेतन निकाली काढावे व अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी बुधवारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले.महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन निकाली काढावे, या मागणीसाठी वैैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मागील मार्च ते मे पर्यंतचे कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही. तसेच सेवा पुस्तक अद्ययावत झाले नाही. कनिष्ठ सहायकाची पदे रिक्त आहेत, आलापल्ली येथील आरोग्य सेविका कुळमेथे यांचे वेतन आॅनलाईन करण्यात आले नाही, तसेच आरसीएच पोर्टलचे जमा करण्यात आलेले अनुदान संबंधित आरोग्य सेविकेच्या खात्यात जमा करण्यात यावे, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरूष व स्त्री शस्त्रक्रिया प्रमोटर व असिस्टंटची रक्कम अदा करण्यात यावी. जानेवारी २०१८ पासून एलआयसी व सोसायटीची रक्कम वेतनातून कपात झाली. परंतु कोणत्याच कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांना व्याजापोटी येणारा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही. तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहिल, असा इशारा आरोग्य कर्मचाºयांच्या वतीने महागावच्या वैैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.कामबंद आंदोलनात एएनएम व्ही. व्ही. घुमे, एस. के. मडावी, जी. एम. तोरे, एच. पी. कुमरे, औषध निर्माण अधिकारी एस. एल. आत्राम एम. आर. नैैताम, परिचर के. एन. तोरे, जी. एम. डोंगरे, डी. पी. म्हशाखेत्री, एमपीडब्ल्यू एस. एम. ढोलणे, एस. मडावी, आरोग्य सेविका एस. डी. हाडगे, एस. एम. सडमेक, एल. आर. कुळमेथे, पठाण, चालुरकर, जुमनाके, कुसराम, पोन्नावार सहभागी झाले.

टॅग्स :Healthआरोग्यStrikeसंप