शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

आरोग्य व्यवस्थेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:38 IST

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी येथील रूग्णालयाला मंगळवारी एकाच दिवशी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली व रूग्णांसह कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देसीएसचा दौरा : एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी रूग्णालयाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली/सिरोंचा : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी येथील रूग्णालयाला मंगळवारी एकाच दिवशी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली व रूग्णांसह कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयाला मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास डॉ. अनिल रूडे यांनी भेट देऊन रूग्णांशी संवाद साधला. त्यानंतर कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी वैैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवर श्रुंगारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गादेवार, जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरएमओ डॉ. भागराज धुर्वे, शंकर तोरे, बालाजी पवार, जीवन काळे उपस्थित होते.सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाला डॉ. अनिल रूडे यांनी भेट दिली असता, युवक क्रांती संघटनेच्या वतीने त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडण्यात आल्या. यामध्ये मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक पद भरण्यात आलेले नाही, नेत्र चिकित्सक, क्ष-किरण तज्ज्ञांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गरीब रूग्णांना शेजारील तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागत आहे, यासह रूग्णालयातील अन्य समस्यांवर चर्चा करण्यात आली.डॉ. रूडे यांनी १०८ रुग्णवाहिकेसाठी लवकरच डॉक्टर उपलब्ध करून देणार व क्ष-किरण तज्ज्ञ अहेरी येथून आठवड्यातून एक - दोन दिवसासाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. ग्रामीण रूग्णालयात औषधीसाठा उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. रूडे यांनी आश्वासन दिले. यावेळी वैैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाकडे, डॉ. वल्क यांच्यासह युवक क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर