शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:21 IST

घोट परिसरात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याही वर्षी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न करून आपल्या शेतात धानपिकाची रोवणी नुकतीच आटोपली. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत साहित्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देबेलगट्टा माल येथे जनजागरण मेळावा : शासकीय योजना, विमा व बँक कर्ज सुविधेबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : जिल्हा पोलीस प्रशासन गडचिरोली व पोलीस मदत केंद्र घोटच्या संयुक्त विद्यमाने बेलगट्टा माल येथे २५ आॅगस्ट रोजी रविवारला जनजागरण मेळावा घेण्यात आला. दरम्यान यावेळी आरोग्य शिबिरही घेण्यात आले. या शिबिरात घोट परिसरातील शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.सदर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून बेलगट्टा मालचे सरपंच विलास चौधरी, घोट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल चाटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक नरेश गलबले, कृषी पर्यवेक्षक पी.पी.गजभिये, अनिल चव्हाण, हेमंत फस्के, पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मिठू जगदाडे यांच्यासह पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील सर्व गावांचे पोलीस पाटील उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी कृषीविषयक योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री सन्मान योजना, जीवन ज्योती विमा योजना तसेच बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्ज सुविधा आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल चाटे यांनी आरोग्य तपासणी केली. तसेच कर्मचाऱ्यांमार्फत बी.पी., शुगर, मलेरिया व रक्त तपासणी करण्यात आली. औषध पुरवठाही करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी पोलीस अधिकारी मिठू जगदाडे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. गावातील नागरिकांनी कोणतीही अडचण आल्यास पोलिसांची मदत घ्यावी, पोलीस सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.मेळाव्याला घोट परिसराच्या १५ ते २० गावांतील शेकडो आदिवासीबांधव, पोलीस कर्मचारी व जवान उपस्थित होते.शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्याचे वाटपघोट परिसरात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याही वर्षी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न करून आपल्या शेतात धानपिकाची रोवणी नुकतीच आटोपली. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत साहित्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बेलगट्टा माल येथे झालेल्या जनजागरण मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांना फावडे, घमेले व इतर शेतीपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

टॅग्स :Healthआरोग्य