लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे निदान होऊन त्याला वेळीच उपचार मिळावे, यासाठी आरोग्य विभागाने माझे कुटुंब, माझी जबदारी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील ७ लाख १८ हजार ९९४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार ३२२ नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, २११ जण बाधित आढळून आले आहेत.कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाचे वेळीच निदान होऊन त्याला उपचार मिळाल्यास त्याच्यापासून इतरांना होणारा संसर्ग टाळता येते. तसेच प्राथमिक स्थितीतच उपचार सुरू झाल्यास संबंधित रूग्णाची प्रकृती लवकर बरी होण्यास मदत होते. राज्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी व्हावी, यासाठी शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची तपासणी करीत आहेत. तपासणीदरम्यान सारी आजाराचे व आॅक्सिजनची कमतरता असणारे २ हजार ६१० जण आढळून आले. त्यापैकी २ हजार ३२२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २११ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. २११ बाधितांमध्ये धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील ५३, एटापल्ली १०, कोरची ४४, देसाईगंज २०, कुरखेडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील ३० रूग्ण आढळून आले आहेत. अहेरी शहरात ९, आरमोरी १५, चामोर्शी ७, गडचिरोली ५, मुलचेरा २, सिरोंचा ७, देसाईगंज शहरात ७ रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ६३ टक्के नागरिकांची आरोग्य तपासणी १३ दिवसांत पूर्ण झाली आहेत. उर्वरित नागरिकांची तपासणी १० आॅक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. पुढील सर्वेक्षण १४ आॅक्टोबरपासून सुरू होणार असून ते २४ आॅक्टोबरपर्यंत चालेल.
आतापर्यंत ७ लाख १८ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST
कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाचे वेळीच निदान होऊन त्याला उपचार मिळाल्यास त्याच्यापासून इतरांना होणारा संसर्ग टाळता येते. तसेच प्राथमिक स्थितीतच उपचार सुरू झाल्यास संबंधित रूग्णाची प्रकृती लवकर बरी होण्यास मदत होते. राज्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी व्हावी, यासाठी शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची तपासणी करीत आहेत.
आतापर्यंत ७ लाख १८ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
ठळक मुद्दे१४ पासून सुरू होणार दुसरा टप्पा : २११ जण आढळले कोरोनाबाधित; १० आॅक्टोबरपर्यंत उर्वरित नागरिकांचे होणार सर्वेक्षण