शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
2
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
3
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
4
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
5
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
6
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
7
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
8
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
9
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
10
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
11
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
12
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
14
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
15
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
16
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
17
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
18
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
19
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
20
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?

कंबलपेठात लावले आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

कंबालपेठा गावाला लागूनच कुकुटपालन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या कुकुटपालन केंद्राला गावकऱ्यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे गावकऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने कुकुटपालन केंद्रावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे कुकुटपालन केंद्र सुरूच आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत आहे.

ठळक मुद्दे१५ नागरिकांवर उपचार : कुकुटपालन केंद्रातील दुर्गंधीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : अंकिसा परिसरातील कंबालपेठा येथील १५ नागरिकांची अचानक प्रकृती बिघडल्याने या गावात आरोग्य विभागाने उपचार शिबिर आयोजित केले. या शिबिरात उपचार घेतल्यानंतर त्यांची सुटी करण्यात आली.कंबालपेठा गावाला लागूनच कुकुटपालन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या कुकुटपालन केंद्राला गावकऱ्यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे गावकऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने कुकुटपालन केंद्रावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे कुकुटपालन केंद्र सुरूच आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे कोंबड्या तसेच त्यांच्या विष्ठेची दुर्गंधी गावात पसरायला लागली.सततच्या दुर्गंधामुळे कंबालपेठा येथील सारक्का येरोला, लावण्या गग्गुरी, सारक्का बद्दी, अक्षय बोेरेम, जगदीश बद्दी यांच्यासह अन्य १५ नागरिकांना उलट्या, मळमळ, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता. याची माहिती अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण आरोग्य कर्मचारी गावात पोहोचले. गावातच शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरादरम्यान डॉ.फाले, डॉ.पी.व्ही.आदर्श, रवी अंडले, धारणे, नितीन वनमामुला यांनी सहकार्य केले. या गावात असलेल्या कुकुटपालन केंद्रामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नागरिकांवर गाव सोडण्याची नामुष्कीकुकुटपालन केंद्रातील दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांचे आरोग्य वेळोवेळी बिघडत चालले आहे. विशेषकरून लहान मुलांना विविध व्याधी होण्यास सुरूवात झाली आहे. भविष्यात या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या जीवावर बेतणारे कुकुटपालन केंद्र हलवावे, याबाबत स्थानिक गावकºयांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र प्रशासनातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. नाईलाजास्तव गाव सोडून दुसरीकडे स्थायी होण्याची नामुष्की गावकºयांवर आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य