शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

सिरोंचा शहर समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:27 IST

सिरोंचा नगर पंचायत होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नियोजनाचा अभाव व नियमित मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरात रस्ते, नाल्या, पथदिवे, अतिक्रमणासह अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. परिणामी सिरोंचा शहर समस्यांचे माहेरघर बनले आहे.

ठळक मुद्देनियमित सीओंचा अभाव : रस्ते, नाली, पथदिव्यांसह अतिक्रमणांची समस्या ऐरणीवर

नागभूषणम चकिनारपूवार ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नियोजनाचा अभाव व नियमित मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरात रस्ते, नाल्या, पथदिवे, अतिक्रमणासह अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. परिणामी सिरोंचा शहर समस्यांचे माहेरघर बनले आहे.७ मे २०१९ पासून २ जूनपर्यंत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी वैद्यकीय रजेवर गेले असल्याचे नगर पंचायतीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. सिरोंचा येथे मुख्याधिकारीपदी नियुक्ती असताना सुद्धा या अधिकाऱ्यांकडे अहेरी नगर पंचायतीचा अतिरिक्त प्रभार होता. त्यामुळे येथील मुख्याधिकारी आठवड्यातून एक ते दोनच दिवस सिरोंचा नगर पंचायतीत कर्तव्यावर दिसत होते. परिणामी नागरिकांना विविध दाखले व इतर कामांसाठी येथे वारंवार चकरा माराव्या लागत होत्या, ही परिस्थित अजूनही कायम आहे. कोंडवाड्यापासून नगर पंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळू शकते. मात्र नगर पंचायतीने कोंडवाड्याचा वापरच केला नाही. ग्रामपंचायतीच्या काळात शहरातील कोंडवाड्याचा नियमित वापर होत होता. मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असतानाही नगर पंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.शहरातील सार्वजनिक विहिरीत भरपूर पाणी आहे. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी या विहिरीतील दूषित पाणी प्यावे लागत आहे. अनेक नागरिक कचरा टाकण्यासाठी विहिरीचा वापर करतात. परिणामी सिरोंचातील विहिरी कचराकुंड्या बनल्या आहेत.घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत नाली स्वच्छता व कचºयाच्या विल्हेवाटीच्या कामाचा कंत्राट अमरावतीच्या एका कंत्राटदाराला देण्यात आला. यापूर्वी कंत्राटदाराला दरमहा ४ लाख ९८ हजार रुपये दिले जातात. मात्र नियोजनाअभावी शहरात नालीची स्वच्छता योग्यरित्या होत नाही. नाल्याचा उपसा नियमित केला जात नसल्याने काही प्रभागातील नाल्या कचºयाने तुडूंब भरल्या आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. अनेक वॉर्डात नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. एकूणच शहर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे.जीर्ण पाणीटाकीकडे दुर्लक्षसिरोंचा नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व वॉर्डात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी विश्रामगृहाजवळ टाकी उभारण्यात आली. मात्र ही टाकी फार जुनी असून ती जीर्ण झाली आहे. सदर पाणीटाकीची स्वच्छता नियमित केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात गढूळ पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सातत्याने मागणी करूनही नगर पंचायत प्रशासनाने पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.न.पं.चा बुडतोय महसूलसिरोंचा येथील आठवडी बाजार व दैनिक गुजरी बाजाराची लिलाव प्रक्रिया यंदा राबविण्यात आली नाही. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी मार्च महिन्यात सदर दोन्ही बाजाराचा लिलाव केला जातो. १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी बाजार लिलाव प्रक्रिया दरवर्षी राबविली जात होती. मात्र यंदा लिलाव प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. नगर पंचायतीचे व्यावसायिक गाळे भाडे तत्त्वावर देण्यात आले नाही. त्यामुळे महसूल बुडत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली