शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

मुख्याध्यापकांना कार्यालयीन कामे डोईजड

By admin | Updated: July 18, 2015 01:37 IST

बालकांचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार बालके प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता गावापासून एक किमीअंतरावर शाळा, अशी तरतूद करण्यात आली.

एक व द्विशिक्षकी शाळा : दैनंदिन नोंदी, रेकॉर्ड, माहितीपत्रक, शैक्षणिक साहित्याचा हिशेब ठेवण्यात जातो वेळगडचिरोली : बालकांचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार बालके प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता गावापासून एक किमीअंतरावर शाळा, अशी तरतूद करण्यात आली. यानुसार खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यात आली. जिल्ह्यात शिक्षणाच्या सोयीकरिता एक शिक्षकी व द्विशिक्षकी शाळांची निर्मिती करण्यात आली. परंतु या शाळांमध्ये मुख्याध्यापकांनाच कार्यालयीन कामासाठी शैक्षणिक व अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने अनेक मुख्याध्यापकांना ते डोईजड झाले आहे.शासनाच्या धोरणान्वये शाळा व परिसर स्वच्छ ठेवणे, पिण्याचे शुद्ध पाणी ठेवणे, बगिचा लावणे, शालेय पोषण आहार शिजविणे व तो विद्यार्थ्यांना वाढणे, भाजीपाला असणे, भोजन स्वादिष्ट ठेवणे, साठा सुरक्षित ठेवणे, वर्ग अध्यापन यासह इतर दैनंदिन नोंदी मुख्याध्यापकांना ठेवाव्यात लागतात. बहुशिक्षकी शाळेच्या मुख्याध्यापकाप्रमाणेच त्यांना सर्व कामे करावी लागतात. त्यामुळे एक व द्विशिक्षकी शाळांतील मुख्याध्यापकांना सदर कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुख्याध्यापक बालकांनाही साफसफाई व घंटा वाजविण्याचे काम सांगू शकत नाही. मुख्याध्यापकांना शैक्षणिक साहित्याची उचल करणे, शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव, मागणीपत्र कार्यालयात नेणे, विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना हजर करणे यासह विविध कामे करावी लागतात. (शहर प्रतिनिधी)