शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हार्वेस्टरने हरविली धान मळणीची मजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:53 IST

धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातील खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजेपुढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । उन्हाळी धान पिकाच्या मळणीसाठी हार्वेस्टर यंत्र विसोरा परिसरात झाले दाखल

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातील खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजेपुढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे धान मळणीची पूर्वीची मजा आता संपली आहे.रोजच्या संशोधन तंत्राच्या बळावर तयार होत असलेल्या यंत्रांनी मानवी जीवनाच्या परिघातील प्रत्येक बिंदूला स्पर्श केला आहे. जे काम फक्त मानवच करू शकतो, असा दृढ समाज मानवाचा होता. मात्र हा समज यंत्रांनी खोटा ठरविला आहे. कृषीप्रधान भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धानाची मळणी करण्यासाठी एक दशकापूर्वी बैल किंवा बैलबंडी हाच एकमेव मळणी यंत्र होता. पुढे ट्रॅक्टरवर चालणारे मळणी यंत्र आले. आता तर त्याच्याही पुढचे तंत्रज्ञान म्हणजे, हार्वेस्टरचा वापर सुरू झाला आहे. हार्वेस्टरच्या वापरामुळे धानाची कापणी, बांधणी व मळणीचा खर्च वाचतो. त्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरचा वापर करीत आहेत. विशेष करून उन्हाळी धान पिकासासाठी हार्वेस्टरचा वापर शेतकरी करीत असल्याचे दिसून येते.कृषी क्षेत्रात यंत्रे आल्याने शेतीची अवघड कामे आता सोपी झाली आहेत. त्यामुळे यंत्रांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला असल्याचे दिसून येते. खरीप हंगामात ट्रॅक्टरवर चालणारे साधे मळणी यंत्र वापरले जाते. मात्र उन्हाळी धान पिकासासाठी विसोरा परिसरातील बहुतांश शेतकरी हार्वेस्टरचाच वापर अधिकाधिक प्रमाणात करीत असल्याचे दिसून येते.खर्च वाढला मात्र उत्पादन तेवढेचपूर्वीच्या काळात संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे सर्व कुटुंब शेतात राबत होते. त्यामुळे शेतीचा खर्च अतिशय कमी होता. रोवणी, कापणी, बांधणी, मळणी ही कामे कुटुंबातील सदस्य स्वत: करीत होते. खते व कीटकनाशकांच्या खरेदीवरच खर्च होत होते. मात्र आता धानाच्या रोवण्यापासून ते मळण्यापर्यंत यंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. मात्र उत्पादनात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. त्यामुळे शेती तोट्याची ठरत आहे.काय आहे हार्वेस्टर यंत्रउन्हाळी धान पिकाची कापणी उन्हाळ्यात होते. कडक उन्हाळ्यात धान पिकाची मळणी करणे शक्य होत नाही. कापणी व बांधणी करण्यास मजूर मिळत नाही. त्यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर केला जातो. हार्वेस्टर यंत्र धानाची कापणी करतात. त्याच वेळी मळणी सुध्दा होते. मळणी झालेले धान यंत्राच्या डब्यात एका ठिकाणी जमा होते. एकाच वेळी सर्व कामे होत असल्याने शेतकरी वर्ग हार्वेस्टर यंत्राच्या वापराला पसंती दर्शवित आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती