शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दीडशे वर्षांपासून हरीनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:43 IST

स्त्री म्हणजे शक्ती. अलौकिक, अद्भुत, अनाकलनीय अशा स्त्रीशक्तीच्या विविधांगी नऊ रुपांसमोर नतमस्तक होण्याचाच नव्हे तर पूजनाचा नऊ रात्रींचा उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव.

ठळक मुद्देकोकडी येथे अखंड परंपरा : नवरात्रोत्सवात गावात एकोप्याचे दर्शन

विष्णू दुनेदार/अतुल बुराडे।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी/विसोरा : स्त्री म्हणजे शक्ती. अलौकिक, अद्भुत, अनाकलनीय अशा स्त्रीशक्तीच्या विविधांगी नऊ रुपांसमोर नतमस्तक होण्याचाच नव्हे तर पूजनाचा नऊ रात्रींचा उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव. मानव जातीवर तथा सृष्टीवर आरुढ होऊ पाहणाºया वाईट प्रवृत्तींच्या नायनाटासाठी, त्यातून मुक्त होण्यासाठी आदीशक्तीची आराधना नवरात्रोत्सवात केली जाते. हीच परंपरा सामाजिक, मानवसेवा व आदरभावाने देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे मागील १५० वर्षांच्या कालावधीपासून नवरात्रीत हरीनाम सप्ताहाच्या रुपात आजही जोपासली जात आहे.कोकडी येथे नवरात्री उत्सवानिमित्त मोठा देऊळ हनुमान मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह व घटस्थापना करण्याची परंपरा सुरू आहे. याबाबत कोकडीचे वयोवृध्द नागरिक गोपाळा मंगरु बन्सोड सांगतात की, त्यांची आई सीताबाई बन्सोड यांचे ३० वर्षांपूर्वी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. तेव्हा गोपाळा बन्सोड हे लहान होते. त्यांच्या आईने लहानपणीच्या नवरात्र उत्सवाच्या प्रारंभाबद्दल सांगितले. गावात सुखसमृध्दी नांदावी, कल्याण व्हावे, लोकांमध्ये आपुलकी, प्रेम, आदर, समर्पण तथा समजूतदारीची भावना वाढीस लागून गावात निरंतर एकोपा टिकून राहावा यासाठीच आमच्या पूर्वजांनी ही भक्ती, प्रार्थना सुरु केली असल्याच्या प्रतिक्रिया ज्येष्ठ मंडळींनी दिल्या. गावातील मंडळींनी ३८ वर्षांपूर्वी लहान हनुमान मंदिर नावाचे देऊळ बांधले. या मंदिरात सुध्दा ३८ वर्षांपासून अखंडपणे हरिनाम सप्ताह व घटस्थापना ही परंपरा सुरू आहे.सात दिवस अनोखा उत्सवनवरात्रीच्या सात दिवसांत सतत कसलाही खंड पडू न देता भजन गायन म्हणजे अखंड टाळी आणि अखंड तेवत राहणारे दीप पेवत असतो. यात अखंड टाळीला विशेष महत्त्व आहे. भजनासाठी गावातील लोकांच्या भजनी मंडळीचे चार गट पाडले आहेत. जे चारचार तासांच्या पाळीत भजन गातात. याशिवाय तुळशीचे जय हनुमान भजनी मंडळ म्हणून आमंत्रित भजनी मंडळ म्हणून यात दरवर्षी सहभागी होतात. या भजनी मंडळातील कलावंतांना तसेच १५० वर लोकांना येथीलच दानशूर व्यक्ती सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी सायंकाळी स्वखर्चाने जेवण देतात. शेवटच्या दिवसाला संपूर्ण गावाला जेवण दिल्या जाते. सुरुवातीला तुळशी, पोटगाव, विसोरा, शिवराजपूर, नैनपूर, किन्हाळा, उसेगावचे भजनी मंडळ दिंडीसह येतात.