शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या शाळांमध्ये वीजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:54 IST

दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यात एकूण २४९ शाळा आहेत. त्यापैकी १४७ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तर १०२ शाळांचे विद्युतीकरण झालेच नाही. ज्या शाळांचे विद्युतीकरण झाले आहे, त्या शाळांनी वीज बिल भरला नसल्याने संबंधित शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यातील स्थिती : डिजिटल व शैक्षणिक साहित्य धूळखात पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यात एकूण २४९ शाळा आहेत. त्यापैकी १४७ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तर १०२ शाळांचे विद्युतीकरण झालेच नाही. ज्या शाळांचे विद्युतीकरण झाले आहे, त्या शाळांनी वीज बिल भरला नसल्याने संबंधित शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.अध्ययनात विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी, तसेच जास्त काळ लक्ष केंद्रीत व्हावे, यासाठी अध्यापन करताना जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्य व डिजिटल साधनांचा वापर करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार अनेक शाळांच्या शिक्षकांनी स्वत:कडचे पैसे खर्च करून तसेच लोकवर्गणी गोळा करून टीव्ही, प्रोजेक्टर व इतर डिजिटल साहित्य खरेदी केले. सदर साहित्य चालविण्यासाठी विजेची आवश्यकता आहे. मात्र शाळेत वीजच नसल्याने हे सर्व साहित्य धूळखात पडून आहेत. ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या एकूण निधीपैकी काही निधी शिक्षणावर खर्च करावा लागतो. या निधीतून शाळेचे वीज बिल भरणे शक्य आहे. मात्र ग्रामपंचायत शिक्षणासाठी असलेला निधी इतर कामांवर खर्च करते. शासन सुद्धा शाळांचे वीज बिल भरण्यास पुढाकार घेत नाही. त्यामुळे वीज बिल भरण्याची गंभीर समस्या शाळांना उपस्थित होते. एखादेवेळी जास्त बिल आल्यानंतर शाळेला वीज बिल भरणे शक्य होत नाही. परिणामी महावितरण वीज पुरवठा खंडित करते. ज्या शाळांना वीज पुरवठा झाला आहे, त्यापैकी निम्म्याहून अधिक शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.ज्या शाळांमध्ये वीज नाही, अशा शाळांची माहिती आकांक्षित जिल्हा अंतर्गत वरिष्ठांकडे सादर केली आहे. सदर शाळांमध्ये सोलर वीज निर्मिती केंद्र लावले जाणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी दिली.कौलारू शाळांची दुरवस्थाप्रत्येकाला पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन केंद्र व राज्य शासनाकडून दिले जात आहे. मात्र ज्या शाळा कौलारू आहेत, त्या निर्लेखित करून पक्क्या इमारती बांधण्यासाठी शासन निधी देत नाही. अनेक शाळांच्या इमारती गळतात. सोयीसुविधांचाही अभाव आहे. त्याच इमारतीत विद्यार्थ्यांना अध्ययन करावे लागते.

टॅग्स :Schoolशाळाelectricityवीज