गडचिराेली : भर एप्रिल महिन्याच्या उन्हात बुधवारी (दि.२१) अवकाळी पावसाने दक्षिण भागातील अर्ध्या तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला. जोरदार वादळ आणि विजांच्या थयथयाटासह आलेल्या या पावसाने अनेक घरांवरील टिनाचे छत हवेत उडवले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे काही भागांत झाडांचीही पडझड झाली. यादरम्यान अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.
चामाेर्शी शहरासह तालुक्यात जाेरदार वादळीवाऱ्यासह पाऊस बरसला. तालुक्यातील नागपूर चक या गावात वादळी पावसामुळे घरांची पडझड झाली. टिनपत्रे व कवेलू उडून पडाली आहेत. अनेक घरमालकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये संताेष रायसिडाम, रवी मडावी, जीवन भाेयर, सुखदेव भाेयर, रत्नाकर भाेयर आदींचा समावेश आहे. संताेष रायसिडाम यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. भामरागड येथेही वादळी पाऊस बरसला. काही घरांवरील टिनपत्रे व कवेलू उडून खाली पडली. एटापल्ली शहरासह तालुक्यात वादळी पाऊस बरसला. काही वेळ विजेचा जाेरदार कडकडाट हाेता. धानाेरा येथे विजेचा कडकडाट हाेता; पण पाऊस बरसला नाही. अहेरी तालुक्यातही पाऊस बरसला नसल्याची माहिती आहे.
गेल्या दाेन दिवसांपासून वातावरण काहीसे ढगाळ आहे. बुधवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि काही वेळातच मेघगर्जनेसह १५ ते २० मिनिटे, तर काही ठिकाणी अर्धा तास पावसाने हजेरी लावली. चामोर्शी, अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तालुक्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. गडचिराेली शहरासह तालुक्यातील अनेक गावांत वादळासह हलकासा पाऊस झाला. त्यामुळे काही गावांतील वीजपुरवठा खंडित झाला हाेता. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
भामरागड येथेही वादळी पाऊस बरसला. काही घरांवरील टिनपत्रे व कवेलू उडून खाली पडली. एटापल्ली शहरासह तालुक्यात वादळासह विजेचा जाेरदार कडकडाट हाेता. धानाेरा येथेही वादळी पाऊस बरसला.
(बॉक्स)
अनेक घरांवरील टिन, कवेलू उडाले
चामाेर्शी शहरासह तालुक्यात जाेरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. नागपूर चक या गावात वादळाने घरांची पडझड झाली. टिनपत्रे व कवेलू उडून पडली. अनेक घरमालकांचे नुकसान झाले. यामध्ये संताेष रायसिडाम, रवी मडावी, जीवन भाेयर, सुखदेव भाेयर, रत्नाकर भाेयर आदींचा समावेश आहे. रायसिडाम यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे.