शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

हळदवाही-रेगडी सर्कलने दिली अनेकदा बाहेरच्या उमेदवारालाच संधी

By admin | Updated: February 10, 2017 02:14 IST

चामोर्शी तालुक्यातील हळवादी-रेगडी जिल्हा परिषद मतदार संघ नेहमीच अपक्ष व बाहेरील उमेदवारांना अधिक संधी देत आला आहे.

प्रवीण खेडकर   भाडभिडीचामोर्शी तालुक्यातील हळवादी-रेगडी जिल्हा परिषद मतदार संघ नेहमीच अपक्ष व बाहेरील उमेदवारांना अधिक संधी देत आला आहे. मागील पाच निवडणुकांपैकी तीन निवडणुका अपक्ष व बाहेरच्या उमेदवारांनी येथून बाजी मारली. दोनवेळा क्षेत्रातील गावांमधील उमेदवार विजयी झाले आहे. काँग्रेसला एकदा तर भाजपला एकदा व तिनवेळा अपक्षांना जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळाली.या क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकदाही विजय मिळविता आला नाही. मात्र २००७ व २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या क्षेत्रात उमेदवार मैदानात उतरविलेला नाही. १९९२ मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. नंदू अध्येंकिवार हे निवडून आलेत. ते घोटचे रहिवासी होते व क्षेत्राबाहेरचे होते. त्यानंतर १९९७ च्या निवडणुकीत मक्केपल्ली येथील रामा बारसागडे हे काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले. त्यानंतर २००२ च्या निवडणुकीत क्षेत्राबाहेरील चामोर्शीचे गजेंद्र गण्यारपवार भाजपच्या तिकीटावर निवडून आलेत. त्यानंतर २००७ च्या निवडणुकीत क्षेत्राबाहेरील ताईबाई कोवासे या अपक्ष म्हणून निवडून आल्या. २०१२ च्या निवडणुकीत सुद्धा बाहेरचाच अपक्ष उमेदवार नामदेव सोनटक्के निवडून आलेत. ते घोटचे रहिवासी आहेत. जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून पाच पैकी तीन निवडणुका अपक्षांनी तर दोन निवडणुका राजकीय पक्षांनी जिंकल्या. यावेळी माजी खा. मारोतराव कोवासे यांचे पुतणे प्रेमानंद कोवासे हे काँग्रेसकडून मैदानात आहे. भाजपकडून मीणा विलास कोडाप व जनसेवा विकास मंचकडून सुधाकर पोटावी मैदानात आहेत. हळदवाही-रेगडी जि. प. क्षेत्र अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून या क्षेत्रामध्ये हळदवाही, भाडभिडी (बि.) पावीमुरांडा, चापलवाडा, रेगडी, विकासपल्ली, माडेआमगाव, माल, मक्केलपल्ली चक १, मक्केपल्ली माल, शिमुलतला आदी ग्रामपंचायती समाविष्ट आहे. हळदवाही-रेगडी जि. प. क्षेत्रात १२ हजार २०० मतदार आहे. हळदवाही पं. स. गणात ५ हजार ८०४ तर रेगडी गणात ६ हजार ३९६ मतदार आहे. १७ हजार ३०५ लोकसंख्या असून १ हजार ३०२ अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.