शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीकॅम्पमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:47 IST

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. आबालवृद्ध हत्तींसोबत मौजमस्ती करीत असल्याचे दिसून येते. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे मागील अनेक वर्षांपासून हत्तीकॅम्प आहेत.

ठळक मुद्देदिवाळीतील सुट्यांचा परिणाम : आबालवृद्ध करीत आहेत हत्तींसोबत मौजमस्ती

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. आबालवृद्ध हत्तींसोबत मौजमस्ती करीत असल्याचे दिसून येते.अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे मागील अनेक वर्षांपासून हत्तीकॅम्प आहेत. जंगलातील लाकडे आणण्यासाठी या हत्तींचा वापर केला जात होता. मात्र वाहने वाढल्याने हत्तींचे काम आता संपल्यागत आहे, असा निष्कर्ष काढून वनविभागाने येथील हत्तींचे दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हाभरातून याला विरोध झाल्यानंतर हत्तीचे स्थानांतरण थांबले.हत्ती हा अतिशय मोठा व जंगली प्राणी असल्याने या प्राण्याला पाहण्याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीला राहते. गडचिरोली जिल्ह्यात एकमेव कमलापूर येथेच हत्ती उपलब्ध आहेत. वर्षभर या ठिकाणी पर्यटक येत राहतात. मात्र दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पर्यटक व प्राणीप्रेमींची संख्या वाढते. यावर्षीच्या दिवाळीतही कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. हत्तीसोबत माऊथ व इतर वनविभागाचे कर्मचारी राहत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य राहते. त्यामुळे पर्यटक हत्तीजवळून हत्तीला पाहू शकतात. त्याचबरोबर काही पर्यटक हत्तीजवळ जाऊन स्वत:ची सेल्फी काढण्याचाही आनंद लूटत आहेत.हत्ती कॅम्पला लागूनच तलाव आहेत. सदर तलावाच्या चारही बाजूला जंगल आहे. त्यामुळे हे निसर्गरम्य स्थळ आहे. तलावात बोटींगची व्यवस्था झाल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढण्यास मदत होईल. मात्र शासनाचे व वनविभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात पर्यटकांना सोयीसुविधा, मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. पर्यटनाला व्यवसायाचे रूप देता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागtourismपर्यटन