गडचिरोली : महापारेषण कंपनीच्या अतिमहत्त्वाच्या तांत्रिक दुरूस्तीच्या कामाकरिता बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिमलगट्टा, सिरोंचा व अंकिसा भागातील वीज पुरवठा बाधित करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाच्या जनजसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.महापारेषण कंपनीला सिरोंचा-आलापल्ली या ६६ केव्ही अति उच्च दाबाच्या वाहिणीवर तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम करावयाचे आहे. त्यामुळे १५ जून रोजी बुधवारला सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या वाहिणीवर अवलंबीत असणाऱ्या जिमलगट्टा व सिरोंचा तसेच बामणी, अंकिसा भागातील वीज पुरवठा बाधित करण्यात येणार आहे. ३३ केव्ही बामणी व ३३ केव्ही अंकिसा वाहिणीवर अवलंबून असलेल्या सर्व ११ केव्हीच्या टेकडा, जिमलगट्टा, रेपनपल्ली, उमानूर, सिरोंचा, अंकिसा, बामणी, झिंगानूर, वडधम या वाहिण्यांवरील वीज पुरवठा खंडीत असणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी ग्राहकांनी महापारेषण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. (प्रतिनिधी)
जिमलगट्टा, सिरोंचा भागातील वीज पुरवठा बाधित होणार
By admin | Updated: June 15, 2016 02:05 IST