शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पिकांबाबत मार्गदर्शन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : खरीप हंगामाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागातील कर्मचाºयांनी शेतकºयांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.२०१९-२० च्या खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती जाणून घेण्यासाठी शुक्रवारी आढावा सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, लिड बँकेचे व्यवस्थापक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी खात्याने अधिक प्रयत्न करावेत. प्रत्येक शेतकºयांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचेल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. कलापथक, पत्रके, माध्यमे आदींच्या माध्यमातून जनजागृती करावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले. जिल्ह्यात यावर्षी हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. सोयाबिनच्या तुलनेत शेतकरी कापूस पिकाला पसंती दर्शवित असल्याने याही वर्षी कापसाचे लागवड क्षेत्र वाढणार आहे.अपघात विम्याची २७ प्रकरणे प्रलंबितराज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा राबवित आहे. या योजनेंतर्गत शेतकºयाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाख रुपयांचा विमा दिला जातो. २०१५-१६ या वर्षापासून शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मागील वर्षात १५१ प्रस्ताव प्राप्त झाले. हे सर्व प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. कंपनीने ५८ प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या वारसांना विमा रक्कम दिली. ३३ प्रस्ताव नामंजूर केले तर २७ प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत, अशी माहिती कृषी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी