कोरेगावात महिला मेळावा : महसूल विभागाचा उपक्रम कोरेगाव/चोप : तहसील कार्यालय देसाईगंजच्या वतीने किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोरेगाव येथे महिला मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान उपस्थित महिलांना रोजगाराच्या संधींबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. महिला मेळाव्याचे उद्घाटन प्रभारी तहसीलदार उपेश अंबादे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पल्लवी लाडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार सोनवाने, कोरेगावच्या सरपंच ममीता आळे, प्राचार्य व्ही. एस. मुंगमोडे, पर्यवेक्षक डी. एच. भावे, अरूण राजगिरे, मंडळ अधिकारी बुराडे, तलाठी शिम्पी, आरोग्य पर्यवेक्षक डाबरे उपस्थित होते. या मेळाव्यात महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वयंरोजगार करून आत्मनिर्भर बनावे, स्वयंरोजगार करण्यासाठी शासनाच्या योजनांची माहिती मेळाव्यादरम्यान देण्यात आली. संचालन जगदीश केळझरकर तर आभार मंडळ अधिकारी बुराडे यांनी मानले.
महिलांना रोजगाराबाबत मार्गदर्शन
By admin | Updated: August 7, 2016 01:49 IST