शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शेतकऱ्यांना मूलभूत हक्कांविषयी मार्गदर्शन

By admin | Updated: February 7, 2015 23:24 IST

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषक विज्ञान मंचाची सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली. या सभेत शेतकऱ्यांना मूलभूत हक्क व कर्तव्यावर मार्गदर्शन करण्यात आले.

गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषक विज्ञान मंचाची सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली. या सभेत शेतकऱ्यांना मूलभूत हक्क व कर्तव्यावर मार्गदर्शन करण्यात आले. मंचाचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. बोमीडवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप लांबे, डॉ. एस. एल. बोरकर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना बोमीडवार म्हणाले की, प्रत्येक नागरिकाचे देशाबद्दलचे प्रेम त्याच्या कृतीतून दिसायला हवे. आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे. सर्व भाषा, धर्म, प्रांत यांना मान देऊन देशाची अंखडता, एकात्मता व एकता यांचे रक्षण केले पाहिजे. जैवविविधता, वन्यप्राणी, जंगल, साधन संपत्ती, सार्वजनिक मालमत्ता यांचे रक्षण करण्याचे आवाहन एस. एम. बोमीडवार यांनी केले. शेतकऱ्याची फसवणूक झाल्यास त्याला ग्राहकमंचाकडे तक्रार करण्याची गरज आहे. बियाणांच्या वापरात फसवणुकीपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन केले. डॉ. एस. पी. लांबे यांनी शेतकरीहक्क कायदा, पीक वाण संरक्षण, गॅट करार या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सीताराम मडावी यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. संदीप कऱ्हाळे तर आभार प्रा. योगीता सानप यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृषक विज्ञान मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)