शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

पालकमंत्र्यांनी गोदावरी नदीच्या सिरोंचा घाटाकडे फिरविली पाठ

By admin | Updated: July 27, 2015 03:11 IST

पुष्कर पर्वानिमित्त सिरोंचा तालुक्याच्या गोदावरी घाटावर अनेक भाविक येऊन स्नान करतात. मात्र राज्य शासनाने या

सिरोंचा : पुष्कर पर्वानिमित्त सिरोंचा तालुक्याच्या गोदावरी घाटावर अनेक भाविक येऊन स्नान करतात. मात्र राज्य शासनाने या ठिकाणी कोणत्याही सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम जबाबदार असून त्यांनी सिरोंचा तालुक्याच्या गोदावरी घाटाला भेट देण्याऐवजी तेलंगणातल्या धर्मपुरी येथे गेले व तिथे पूजा केली, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश भोगे यांनी केला आहे. तेलंगणा सरकारने सिरोंचाला लागून असलेल्या कालेश्वर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी ४० कोटी रूपये खर्च केले. पुष्कर मेळाव्यानिमित्त तेलंगणा सरकारने योग्य नियोजन केले होते. त्यामुळेच कालेश्वरला मागील दहा दिवसांत २५ लाख भाविकांनी भेट दिली आहे. पुष्कर निमित्ताने सिरोंचा तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांची तसेच तीर्थक्षेत्रांची जाहिरात करण्याची चांगली संधी निर्माण झाली होती. गोदावरील नदीघाटावर सिरोंचा तालुक्यात नगरम, चिंतलपल्ली, आरडा, सोमनूर हे नदीघाट आहेत. जे भाविक नाशिकला जात नाही. ते सिरोंचा येथे येऊ शकले असते. आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून स्वत:चे राजकीय वजन वापरून निधी आणला असता व सोयी- सुविधा निर्माण केल्या असत्या तर कालेश्वरप्रमाणेच सिरोंचा घाटांवरही गर्दी जमली असती. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी केवळ आठ दिवसांत निधी मंजूर करून सोयी- सुविधा पुरविल्या होत्या. मात्र सध्याचे पालकमंत्री आत्राम यांनी निधी उपलब्ध करून न दिल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. या नाराजीची कल्पना असल्यानेच पालकमंत्र्यांनी तेलंगणातील धर्मपुरी येथे जाऊन पूजा केली. भविष्यात तरी सिरोंचा तालुक्याच्या विकासाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सतीश भोगे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)