शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळी अर्ध्या मीटरने खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:45 IST

भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी अर्धा मीटरने खोल गेली आहे. दरवर्षीच पाणी पातळी खोल जात असल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे११२ विहिरींची पाहणी : सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विभागाचे असेही निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी अर्धा मीटरने खोल गेली आहे. दरवर्षीच पाणी पातळी खोल जात असल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात १३०० मिमी पाऊस पडते. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. पर्जन्यमान अधिक असल्याने पाणी पातळीही वरच राहत होती. जास्तीत जास्त मे महिन्यात थोडीफार पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. मात्र मागील काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातही बोअर मारले जात आहेत. बोअर हे १०० ते २०० फुटापर्यंत राहतात. बोअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. सिंचन विहिरींच्या माध्यमातूनही पाणी उपसा होत आहे. मात्र पाणी साठून राहिल, यासाठी उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.भूजल पातळी मोजण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभाग करतो. यासाठी बाराही तालुक्यात ११२ विहिरी ठरविण्यात आले आहेत. या विहिरींच्या निरिक्षणातून पाणी पातळीबाबतचा अंदाज बांधला जातो. मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण केले होते. यामध्ये आरमोरी व मुलचेरा तालुक्यात भूजल पातळी सर्वाधिक ०.६३ मीटरने खोल गेली आहे. धानोरा तालुक्याची भूजल पातळी ०.६१ मीटर, गडचिरोली ०.४३ मीटर, देसाईगंज ०.६० मीटर, अहेरी ०.३२ मीटर, एटापल्ली ०.३० मीटर, भामरागड ०.१३ मीटरने घटली आहे. दरवर्षी जवळपास अर्धा मीटरने भूजल पातळी घटत असल्याने ही भविष्यात धोक्याची घंटा ठरणारी आहे.बोअर खोल खोदण्याची स्पर्धा थांबायला हवीजमिनीत एका विशिष्ट पातळीपर्यंत पाणी मिळते. त्यानंतर पाणी मिळत नाही. त्यामुळे जेवढे खोल खोदू तेवढे पाणी अधिक मिळेल, हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. सद्य:स्थितीत विहिरींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास विहिरी पूर्णपणे कोरड्या पडतील व हळूहळू १०० फुट खोल खोदलेल्या हातपंपातूनही पाणी येणार नाही. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. तसेच जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरेल, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई